जिल्हा सचिव पदी भारती बाई रणवीर यांची निवड
नविन नांदेड| सिडको भागातील गेली अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात कार्य करणाऱ्या सौ कविता चव्हान यांची नांदेड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी तर भारतबाई रणवीर यांची जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली. सदरील निवड ही नांदेड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा सौ कविता कळसकर यांनी केली.
सदरील निवडीचे नियुक्तीपत्र नांदेड मनपाच्या माजी महापौर तथा काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मंगलाताई निमकर व जिल्हाध्यक्षा सौ.कविता कळसकर यांच्या हस्ते सौ.कविता चव्हाण व सौ.भारतबाई रणवीर यांना प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण व माजी आमदार सौ.अमिताभाभी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, या निवडीबद्दल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.