दरवर्षी प्रमाणे याही वर्षी होळी सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, सिडको परिसरातील अनेक भागात होळी पारंपारिक सणा निमित्ताने अनेक भागातील युवकांनी लाकडे, शेणाच्या गौरी व एंरडा फाटा यासह विविध साहित्य संकलन करून मोठ्या प्रमाणात उंच असलेल्या होळी चे दहन करण्यात आले, यावेळी महिलांनी विधीवत पुजन केले, सिडको परिसरातील शिवाजी चौक भागात युवा नेते उदय भाऊ देशमुख यांच्या हस्ते तर वाघाळा येथे गोविंद चिखले यांनी पुजन केले तर ज्ञानेशवर नगर, हडको व परिसरातील अनेक भागात होळी उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामीण भागातील राहेगाव,भायेगाव,किक्की , विष्णुपुरी, असरजन, अनेक गावांत ही उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ऊपसिथीत युवकांनी होळीचा सणांचा एकमेकांना शुभेच्छा दिल्या,होळी सणांचा पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस स्टेशन हदीत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली १० अधिकारी,५६ अंमलदार ,२९ होमगार्ड पोलीस बंदोबस्त साठी तैनात करण्यात आले आहे,गोपीनाय शाखेचे बालाजी दंतपाले, बालाजी चौधरी यांनी बंदोबस्त साठी सहकार्य केले.