पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम गार्डन लगत असलेल्या संरक्षण भिंतीचा जागेत दृर्गा नवनाथ खोडं वय ३७ रा.अस्था सिटी कौठा नांदेड येथे वास्तव्यास असलेल्या महिलेचे रसवंती गृह असून १७ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास ऊसाचा रस काढण्यासाठी यंत्र चालु केले असतांना अचानक अंगावरील साडीचा पदर यंत्रात गेल्याने अंगावरील साडीने गळफास घेतल्याने तात्काळ पतीने घटनास्थळी धाव घेऊन सदरील पत्नीला लागलेला गळ्याभोवती साडीचा फास काढला तो पर्यंत या महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाला.
घटना स्थळी ग्रामीण चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार राजु हुमनाबादे, बालाजी कोडांवार , गणपत पेदे चालक प्रकाश मुंढे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवला आहे. केवळ एका मिनिटातच या महिलेच्या मृत्यू झाला, होळीच्या दिवशी कष्टकरी महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव झाला होता.
सदरील महिलेचे पती हे अस्था सिटी येथे वाचमन म्हणून कार्यरत आहे, तर मृत महिलेचा पश्चात दोन लहान मुले आहेत,या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यू गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया चालू होती.