प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून सन २०१५ पासून राज्यभरात शेतीच्या नापिकीने कंटाळलेल्या तसेच बँक आणि खाजगी सावकारी कर्जाच्या ओझ्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली . अशा शेतकरी कुटुंबांना आधार म्हणून नाम फाऊंडेशन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसास आर्थिक मदत पुरवते. रविवारी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे धनादेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला. सदरील कार्यक्रमास नाम फाऊंडेशनचे जिल्हा संघटक केशव घोणसे पाटील यांच्या हस्ते मुखेड तालुक्यातील ६ नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा वारसांना नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.
यावेळी पोलिस निरिक्षक विलास गोबाडे, पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा संघटक शेख रियाज, पत्रकार संरक्षण समिती तालुकाध्यक्ष शेख हसनोद्दीन, मुखेड तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष संदिप कामशेट्टे, मुखेड तालुका मराठी पत्रकार संघ सचिव अनिल कांबळे, पत्रकार शेखर पाटील, शिवकांत मठपती, किशोर चौव्हाण, दत्तात्रय कांबळे, ज्ञानेश्वर डोईजड, जयभीम सोनकांबळे, नामदेव यलकटवार, शिवराज पाटील, मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर, सामजिक कार्यकर्ते अदनान पाशा, योगेश मामीलवाड, सय्यद नयुम मुल्ला आदींसह आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारस व नागरिक उपस्थित होते .