लोहा| लोहा शहराच्या जवळ असलेल्या बोरगाव (आ) येथे मागील दोन महिन्या पूर्वी ग्रामपंचायत आजी- माजी सत्ताधाऱ्यात जोरदार हाणामारी झाली होती .दोन्ही गटातातील प्रमुखावर पोलीस कार्यवाही झाली होती त्यानंतर सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक झाली यात कृउबा समितीचे माजी उपसभापती मारुती पाटील बोरगावकर - माजी सरपंच बालाजी पाटील व सहकाऱ्याच्या पॅनेलचा दणदणीत विजय झाला.
शहराच्या नजीक असलेल्या बोरगाव ( आ) हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानले जाते .ग्रामपंचायत च्या राजकारणात आजी माजी सरपंच गटात मागील दोन महिन्या पूर्वी वाड झाला त्यात दोन्ही गटावर पोलीस कार्यवाही झाली होती त्यानंतर बोरगाव -सोनामांजरी या सेवा सोसायटीची सार्वत्रिक निवडणूकी पार पडली."दाम " व राजकारण जोरदार चालले. चुरशीच्या लढतीत कृउबा समितीचे माजी उपसभापती मारोती पाटील बोरगावकर व माजी सरपंच बालाजी पाटील बोरगावकर यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. त्याच्या गटाचे १३ पैकी १० जागेवर उमेदवार विजयी झाले. विरोधक लोंढे गुरुजी गटाला केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले आहे.
विजय उमेदवार मारोती कुशबराव पाटील,पांडुरंग सखाराम लोंढे, आंबेगाव लक्ष्मण उत्तमराव,पांडुरंग दत्ता पाटील ,नागोराव ग्यांनू लोंढे,मिठू थावरा राठोड, तुळसाबाई पांडुरंग पाटील,सुलोचना नारायण पाटील, लक्ष्मीबाई भीमराव गायकवाड,सुरनर श्रीपती संभाजी. हे उमेदवार विजयी झाले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हसराज पाटील बोरगावकर, बालाजी पाटील व सहकारी यांचे मदत झाली माजी सभापती खुशाल पाटील शिवसेना तालुका प्रमुख ,सुरेश पाटील हिलाल, गाडेकर पंडितराव,माधवराव पाटील, सुभाष पाटील, गोविंदराव पाटील दिगंबर लोंढे, रामराव पाटील, राम पवार रंगनाथ पाटील ,उत्तम राठोड लोखंडे आप्पराव, धनजय पाटील, शिवा पवार, शरद पाटील, माजी सरपंच अमोल पाटील ढगे, नारायण एडके, व मित्रांनी सहकार्य केले. माजी चेअरमन मारोती पाटील बोरगावकर यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. सर्व सभासदांचे आभार मानले.यात मारुती पाटील यांच्या गटाचे दोन उमेदवार ईश्वर चिट्ठीने पराभूत झाले. पण विरोधकांना जोरदार धक्का देत विजय संपादन केला आहे.