नदीकाठावरील ४५ गावातील पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर
हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी डिसेंबर महिन्यापासून कोरडी ठाक पडल्याने नदी काठावर अवलंबून असलेल्या गावासह जनावरांच्या चारा आणि पाण्याची भीषणता वाढली आहे. हि बाब लक्षात घेत इसापूर धरणातून पैनगंगेच्या नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे आणि जाणावरांच्या चाऱ्यासाठी छावणी उभारावी अशी मागणी नदीकाठावरील गावकरी, शेतकऱ्यांकडून होत आहे.
पैनगंगा नदीकाठावर अवलंबून असलेल्या ४५ गावकर्यांना यंदा डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, आजघडीला पैनगंगा नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. खरे पाहता पाणी टंचाई लक्षात घेता येथील पंचायत समिती स्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन पाण्याची मागणी करणे क्रमप्राप्त आहे. परंतु नदीकाठावरील त्या त्या गावचे सरपंच व ग्रामसेवक या बाबतीत दुर्लक्ष करत असल्याने पाणी टंचाईच्या झळा ग्रामस्थांना सहन कराव्या लागत आहेत. यंदा खरीप हंगामात वरून राजाने शेवटच्या टप्प्यात जोरदार हजेरी लावली मात्र नदीवर बंधारे नसल्यामुळे पावसाचे पाणी पुढे वाहून गेल्याने नोव्हेंबर - डिसेंबर पासूनच नदी काठावरील गावकर्यांना भीषण पाणी टंचाई बरोबर जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आजघडीला गांजेगाव आणि मुरली येथील बंधाऱ्याजवळ अल्प प्रमाणात पाणी आहे. एवढ्या पाण्यावर वरील गावकरी तहान भागणे शक्य नाही. या प्रकारामुळे नागरिक, शेतकरी हतबल झाले असून, पाणी नाही, चार नाही, म्हणून आपली जनावरे आठवडी बाजारात विक्रीला आणत आहेत.
दरवर्षी पाण्याची मागणी विदर्भ मराठवाडा वासीयांकडून होत असते. त्यामुळे प्रशासनाने देखील पाणी टंचाईच्या बाबतीत पुढाकार घेऊन यावर मात करण्यासाठी मंजुरी प्रमाणे पाणी पाळी सोडणे गरजेचे असल्याचे मत सुजाण नागरीकातून व्यक्त होत आहे. आजघडीला पाणीटंचाईने हैराण झालेले शेतकरी जनावरांना विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. परंतु येथे देखील जनावराना भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला असून, शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी आणि नुकसानीची मदत बहुतांश शेतकऱ्या पर्यंत पूर्णतः पोचली नसल्याने आजही अनेक शेतकरी भारतीत स्टेट बैंकेत कर्जमाफी व नांदेड जिल्हा मध्यवर्ती बैंकेत अनुदानाचा निधी मिळविण्यासाठी चकरा मारत आहेत. त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडला आहे.
खरीपात यंदा मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे खरिपाची पिके नेस्टनाबूत होऊन गेली, एवढेच नाहीतर पावसाचे पाणी नदीवर बंधारे नसल्यामुळे पुराणे वाहून गेले. खरिपात झालेले नुकसान रब्बीच्या पिकातून काढून अशी अशा धरून शेतकऱ्यांनी मेहनत घेतली, मात्र अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने रब्बीच्या उत्पादनातही घट निर्माण केली आहे. या परिस्थितीने शेतकरी, माजरदार नागरिक हैराण झाले असतं आता पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या नुकसानीच्या चिंतेत बळीराजा असताना पैनगंगा नदी कोरडीठाक पडल्यामुळे नदीकाठावरील शेतकरी, नागरिकांना पाणी टंचाई भेडसावत आहे. जनावरांना जमा असलेल्या खड्ड्यातील पाणी पिवून आजारांना बळी पडावे लागत आहे. तर मनुष्याच्या पक्षांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. या परिस्थितीची जाणीव लक्षात घेता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर धरणातील पाणीसाठा पैनगंगा नदीत सोडून पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या मानवांसह मुक्या जनावरांना दिलासा द्यावा अशी मागणी घारापुर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, एकंबा, कोठा, आदींसह नदीकाठावरील नागरिक शेतकरी करीत आहे.
हिमायतनगर शरातील ५० टक्के बोअर आटले
पैनगंगा नदी कोरडी पडल्याने हिमायतनगर शहरातील बहुतांश बोअरची पाणी पातळी घटली असून, त्यापैकी ४० टक्के बोअर आटले आहेत. तर ३० टक्के बोअरचे पाणी कमी झाले असून, परिणामी शहरातील नागरिकांनी पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शहरासाठी १९ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, परंत्तू तीचे काम संत गतीने आणि निकृष्ट व अंदाजपत्रकाच्या बगल देऊन केले जात असल्याने हि योजना कुचकामी ठरण्याची भीती शहरवासीयांना आहे. नळयोजनेचे काम करताना ठेकेदाराने आत्तापर्यंत नदीकाठावर पाण्यासाठे साठवण टाके उभारले नाही. तसेच शहरातील पाण्याच्या टाकीचे कामही अर्धवट अवस्थेत असताना शहरातील रस्ते खोदून ठेऊन पाईपलाईन करून निधी उचला करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे गेल्या २ वर्षापासन सुरु असलेल्या नळयोजनचे पाणी यंदा तरी मिळेल हि अशा धूसर झाली आहे. आता हि पाणी पुरवठा नळयोजना आधांतरी लटकुणी असंल्याने शहरातील नागरिकांची भिस्त पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे नदीपात्रात बाबी सोडणे गरजेचे असून नदीमध्ये पाणी सोडल्याने बंद पडलेले बोरवेल सुरु होऊन काही प्रमाणात का होईना पाणी टंचाईच्या समस्येवर मात करणे सोईचे होणार आहे.