दि.२३ मार्च रोजी अविवाहित मुलींसाठी कश्मीर फाईल्सच्या स्पेशल शोचे आयोजन -NNL

संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली माहिती 


नांदेड|
मिशन कश्मीर फाईल्स या उपक्रमाला तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, रविवारी तिकीट वितरणाच्या चारही केंद्रावर फक्त अर्ध्या तासात सर्व तिकिटे संपल्यामुळे खास पालकांच्या आग्रहास्तव  बुधवार दि.२३ मार्च रोजी दुपारी तीन वाजता पीव्हीआर सिनेमागृह कवठा नांदेड येथे १६ ते २१ वर्षापर्यंतच्या अविवाहित मुलींसाठी स्पेशल शोचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. 

भाजपा  महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ नांदेड च्या वतीने रविवारी लोकसहभागातून अकराशे तरुणांना तिकीटे देण्यात आली. बुधवारी सकाळचा नऊ वाजता चा पहिला शो धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे, दुपारी पावणे बारा चा शो डॉ. महेश तळेगावकर यांच्यातर्फे तर महिला व मुलींसाठी राखीव असलेला दुपारी साडे बाराचा शो एका अज्ञात राष्ट्रभक्तातर्फे मोफत दाखविण्यात येणार आहे. 

इतर शोसाठी पुढील दानशूर नागरिकांनी तिकिटे प्रायोजित केलेली आहेत. रमाकांत संभाप्पा भंडारे भावसार चौक,सतीश बाहेती मालेगाव, बाबुराजाजी कचरूलालजी झंवर ऊमरी स्टेशन यांनी प्रत्येकी एकावन तिकीटासाठी देणगी दिली आहे. प्रत्येकी पन्नास तिकिटे देणाऱ्यांमध्ये भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ओम प्रदीपराव बंडेवार व गणेश गंगाधर महाजन बा-हाळी यांचा समावेश आहे. स्नेहलता जायस्वाल यांनी पस्तीस तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर यांनी तेहतीस तिकिटे दिली आहेत.सतीश सुगनचंदजी शर्मा, विलास बाहेती मालेगाव यांनी प्रत्येकी पंचवीस तिकिटे प्रायोजित केली आहेत.भाजपा महिला मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षा चित्रलेखा गोरे,भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सुमित नरसिंह राठोड, चरैवेती सुप्रभात संघ,प्रीती सतीशसिंह चौहान भावसार चौक यांनी प्रत्येकी विस तिकीट साठी योगदान दिले आहे.

शशिकांत विलासराव देशपांडे बाराळी,किशोर नोमूलवार भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, सिद्राम दाडगे,घनश्याम शर्मा,आशा शर्मा  हैदराबाद,पुष्पराज जैस्वाल हैदराबाद,सूरज चौधरी हैदराबाद, प्रवीण अवधिया जैस्वाल,प्रा.भगवंतराव मुकुंदराव इरपेनवार, किनवट,सचिन कांबळे लोण,गजानन उत्तरवार, प्रा. राजेश कुलकर्णी,सागर गंधमवार शिवाजीनगर,किरण लक्ष्मणराव देशपांडे अंबिकानगर, पद्माकर कोडगिरे पुणे,राजेश भराडीया ,रजनी शेडुपुरे जायसवाल,जगदीश प्रसाद अवधिया,सतीश राजाराम यनगंदेवार,कंडक्टर धर्माबाद, ॲड.अशोक भुतडा,शंतनू देशमुख रेल्वे कर्मचारी नांदेड,काश्मिरी पंडितांबद्दल आस्था  असणारे नांदेडचे एक व्यापारी, अंकुश पद्माकर पार्डीकर,मोहित जयप्रकाश सोनी, रेणुका जयप्रकाश सोनी,अशोक मष्‍णाजीराव गंदपवार शहराध्यक्ष देगलूर भाजपा,धनश्री बक्षी,सुधाकर हैदराबाद, स्वप्निल जैस्वाल पुणे,संजना देवी राजस्थान,शिल्पा जैस्वाल हैदराबाद,अविनाश चिंतावार मुंबई, अभिजीत बिडवई मुंबई, यांनी प्रत्येकी दहा तिकीटासाठी देणगी जमा केली आहे.

एका तिकिटाची किंमत ₹ १४० आहे. तसेच मध्यंतरात ₹ ७० चे पाॅपकार्ण देण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण ₹ २१० किंमत असलेले तिकीट ₹ ५० दिल्यानंतर  तरुणांना मिळतील. तरुणांनी जरी ₹ ५० ला तिकीट घेतले तरी त्यांना सत्तर रुपयाचे पाॅपकार्ण मिळणार असल्यामुळे कश्मीर फाईल्स हा चित्रपट मोफतच पाहायला मिळणार आहे.देणगी देणाऱ्यांची नावे शो च्या दिवशी पीव्हीआर सिनेमा च्या समोर होर्डिंग द्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.तसेच उद्घाटनाच्या वेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

ज्या मुलींना बुधवारी चित्रपट  पाहायचा आहे. त्यांनी मंगळवार दि.२२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता भाजपा महानगर कार्यालय विष्णू कॉम्प्लेक्स, व्हीआयपी रोड, नांदेड या ठिकाणी प्रति टिकीट ₹ ५० जमा करून तिकिटे घ्यावी. एका मुलीला फक्त एकच तिकीट देण्यात येणार असल्यामुळे व फक्त एकशे तीस तिकीट शिल्लक असल्यामुळे मुलींनी वेळेवर येऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर व व्यंकट मोकले, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख धीरज स्वामी, सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव,सहसंयोजक अक्षय अमिलकंठवार, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल सचिव अरुणकुमार काबरा, कोषाध्यक्ष सुरेश निल्लावार,प्रोजेक्ट चेअरमन स्नेहलता जायस्वाल, अंकुश पार्डीकर, अजयसिंह परमार, रोहित ठाकूर, कपिल यादव यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी