हदगांव तालुक्यातील शेतकरी म्हणताहेत, आता ई-.केवायसी काय भानगड -NNL

प्रशासनाने जनजागृति करावी... 


हदगाव,शे चांदपाशा|
तालुक्यातील शेतकरी यापुर्वीच नैसर्गिक संकट घटणारी पिकाची उत्पादन क्षमता आणि वाढलेला उत्पादन खर्च केद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण मंञालयद्वरे 'प्रधानमंञी किसान सन्मान योजना' द्वरे शेतक-याना लाभ देण्यात येतो. मिळालेल्या माहीतीनुसार या योजनेद्वरे दर वर्षी सहा हजार रुपयाचे अर्थसाहाय्य अनुदान तीन टप्प्यात वितरित करण्यात येत आहे. 

परंतु आता हे अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई- केवायसी लागु करण्यात आल्यामुळे अगोदरच ञस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता हे माणवनिर्मित संकट दिसत आहे कारण ही 'ई- केवायसी काय भानगड आहे. हे शहरातील व तालुक्यातील कोणत्या ही बँकेत शेतक-याना या बाबतीत माहीती देण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी कुठं जाव असा प्रश्न पडला आहे. अनेक शेतकऱ्यांत च्या मणात या बाबतीत गोधळ निर्माण झालेल आहे.

जाणकारांचे म्हणने ... या बाबतीत काही बँकेच्या काही  जबाबदार अधिका-याशी व जाणकाराशी माहीती घेतली असता त्यांनी सागीतले की ही ई-. केवायसी शेतक-याकरिता अत्यत चांगली असुन सदर प्रक्रिया पारदर्शकतेसाठी आहे या बाबतीत कृषि महसुल विभागाच्या माध्यमातून माहीती सहज ही प्रक्रिया होऊ शकते अशी माहीती मिळाली

नेत्यानी आदेश दयावे... हदगाव शहरात व तालुक्यात विविध राजकीय पक्षाचे भरपुर नेते आहे त्यांनी आपल्या कार्यकर्ते यांना  आदेश दियावे की पीएम किसान योजना अतर्गत पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी व तसेच बोगस लाभर्थी शोधण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. त्याकरिता हदगाव शहरासह तालुक्यातील शेतक-यानी ३१मार्च पुर्वी ई-केवायसी करुन घ्यावी. अन्यथा पुढील एप्रिल महीण्याचा हप्ता मिळणार नाही अशी माहीती आहे. विशेष म्हणजे मिळालेल्या माहीती नुसार यापुढे ज्या शेतक-याची ई-केवायसी झालेली असेल अश्याच शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. या करिता जबाबदार नेत्यानी आपल्या कार्यकर्ते मार्फत विशेष मोहीम द्वरे जनजागृती करावी अशी अपेक्षा शेतक-यात व्यक्त केली जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी