प्रा.विकास सुकाळे यांना सौ.अरुणा रारावीकर पुरस्कार प्रदान -NNL


नांदेड|
नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.विकास सुकाळे यांना मराठी अर्थशास्त्र परिषदेच्यावतीने सौ.अरुणा रारावीकर स्मृती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम अमरावती जिल्ह्यातील चांदुबाजार येथील गो.सी.टोंम्पे महाविद्यालयात 44 व्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्यावतीने रविवार दि.13 रोजी पार पडला. गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ.अनिल सूर्यवंशी आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांच्या हस्ते प्रा.विकास सुकाळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

मराठी अर्थशास्त्र परिषदेच्यावतीने दरवर्षी वृत्तपत्रामध्ये सर्वोत्कृष्ट आर्थिक लेखन केल्याबद्दल प्रा.सौ. अरुणा रारावीकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार नांदेडचे प्रा.विकास सुकाळे यांना देण्यात आला आहे. नांदेड येथील नांदेड वार्ता या सायं दैनिकांत ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने प्रा. सुकाळे यांनी ‘मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणी प्रश्न’ असा लेख लिहिला होता. 

या पुरस्काराबद्दल नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सीए प्रविण पाटील, सचिव श्यामलताई पत्की, सहसचिव प्रफुल्ल अग्रवाल, ऍड.प्रदीप नागापूरकर, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि प्राध्यापक मित्रांनी प्रा.विकास सुकाळे यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी