समाजाच्या विकासासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे - नागोराव डोंगरे -NNL


नांदेड|
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे. महिला जोपर्यंत सशक्त होणार नाही तोपर्यंत समाजात कोणताही बदल होणार नाही.  मानवतावादी विचार रुजविण्यासाठी व त्या विचारांचे खऱ्या अर्थाने पालन करून समतामूलक समाज निर्मितीचा प्रयत्न व्हायला हवेत. प्रत्येकाने समाजाच्या उन्नतीसाठी समाजाची शक्ती योग्यरित्या वापरली गेली पाहिजे. समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची खरी जबाबदारी आता महिलांवरच आहे त्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन येथील स्त्रीवादी कवी नागोराव डोंगरे यांनी केले. 

यावेळी भंते धम्मपाल, ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, सरपंच साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, आकाशवाणीचे निवेदक आनंद गोडबोले,  श्रीरंग गच्चे, मा.उपसरपंच पुरभाजी गोडबोले, वसंत गोडबोले, मा.ग्रा प सदस्य मिलिंद गोडबोले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, रमेश  गोडबोले, उपासक सुरेश गोडबोले, अनिल गोडबोले, किशन गोडबोले, मा उपसपंच शिवाजी गच्चे, राजेश गच्चे आदींची उपस्थिती होती. फाल्गुन पौर्णिमेनिमित्त जवळा देशमुख येथे 'पौर्णिमोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन विश्वशांती बुद्ध विहारात युवा कार्यकर्ते लखन करकडे यांच्या परिवाराकडून करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप धूप आणि पुष्प पूजन करण्यात आले. त्यानंतर भंते धम्मपाल यांच्याकडून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. 

त्रिरत्न वंदना भीमस्तुती गाथापठणानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यात 'महिलांचे सक्षमीकरण आणि भारतीय समाज' या विषयावर कवी डोंगरे बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, लहानपणीच आपल्या मुलांवर योग्य संस्कार झाले पाहिजेत. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उच्च शिक्षण देणे आवश्यक आहे. यात हलगर्जीपणा केल्यामुळे आजची युवा पिढी व्यसनाधीनतेकडे वळली आहे. त्यामुळे युवकांचे आयुष्य अंधाराच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे समाजाच्या विकासात अडथळे निर्माण होत आहेत. या चक्रव्यूहातून युवकांना तथागताचा धम्मच बाहेर काढू शकतो. बुद्ध विहारे ही संस्कार केंद्र म्हणून विकसित झाली पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे म्हणाले की, शिक्षण हे सर्वांगीण प्रगतीचे महाद्वार आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकारांचा योग्य वापर करून आपण आपली प्रगती साधू शकतो. नवभारताच्या निर्मितीचा पाया भारतीय संविधानातच आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन आनंद गोडबोले यांनी केले तर आभार सुरेश गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  मिनाक्षी करकडे , सीताबाई  करकडे यांच्या परिवारासह चांदु गोडबोले, हिरामण गोडबोले, बाबुराव गोडबोले, संभाजी गवारे, पंडित गच्चे, तुकाराम गच्चे, जनार्धन गच्चे, समाधान लोखंडे, उत्तम लोखंडे, प्रकाश गोडबोले, अमोल गोडबोले, आकाश गच्चे, छगन गच्चे, रत्नदीप गच्चे, बालचंद गोडबोले, मिलिंद गोडबोले, नामदेव गच्चे, केशव गोडबोले, रमेश गोडबोले, विकी गोडबोले, विकास गोडबोले, दर्शन गोडबोले, सुमेध गोडबोले, ईश्वर गच्चे, रविकांत गच्चे, विजय गोडबोले, प्रदीप गच्चे, साहेब गोडबोले, विशाल गोडबोले, सिद्धांत पंडित, आयलाजी गोडबोले,  प्रवीण गोडबोले, संघर्ष गच्चे, पंकज गोडबोले, आकाश गोडबोले, चीकू गच्चे, अभी गोडबोले, मुन्ना गोडबोले, साहेब गोडबोले,  रविराज गोडबोले, सुरेश गोडबोले, आनंद गोडबोले, विवेक गोडबोले, सत्यजीत गोडबोले, महेश पाईकराव, आभिमान गच्चे, राष्ट्रपाल गच्चे, साईनाथ गोडबोले, किशन गोडबोले, मोकिंद गोडबोले व समस्त गावकारी मित्र मंडळाने परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी