आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराच्या योग शिबिरास मुखेडला मोठा प्रतिसाद
मुखेड येथील आर्ट ऑफ लिविंग व्यक्ती विकास केंद्र परिवाराच्या वतीने कोत्तावार ऑईल मिल येथे ०६ दिवसीय आनंद अनुभूती योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आले. सहा दिवसीय शिबिरात विविध उपक्रमाची माहिती देण्यात आल. योग शिक्षक श्री अनिल सौताडेकर यांनी योग शिबिरात साधकांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले योग शिक्षक गणेश टेंबुर्णे, संगीता टेंबुर्णे, सौ विजया वावधाने, शिवराज साधू ,बस्वराज निरर्णे यांच्या पुढाकारातून योग शिबिर पार पडले. यावेळी. मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे यांनी साधकांना मार्गदर्शन करते वेळी म्हणाले , प्रत्येक नागरिकांनी समाजासाठी कार्य केले पाहिजे.
आपले जीवन तणावमुक्त होण्यासाठी आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जीवनात श्वास आणि विश्वास महत्त्वाचा आहे. दोन्ही अदृश्य आहेत पण ते अति आवश्यक आहेत. आपल्यातील अहंकार दूर करून परमार्थाच्या कार्याला प्राधान्य दिले पाहिजे. योगाचे महत्त्व प्रत्येकाने लक्षात घेऊन स्वतःसाठी योगाचा अभ्यास करणे काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकांनी साधना, सातत्य, सेवा जपली पाहिजे. आर्ट ऑफ लिव्हीग परिवाराचे कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे म्हणून आर्ट ऑफ लिविंग परिवाराचा साधक होऊन आपले जीवन आनंदी करून घेणे काळाची गरज असल्याचे मत डॉ. दिलीप पुंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी योग शिक्षक श्री अनिल सौताडेकर ज्यांनी आर्ट ऑफ लिविंग परिवारा बाबतची सविस्तर माहिती दिली श्री श्री श्री रविशनकर गुरुजी यांच्या विषयी माहिती दिली व सुदर्शनक्रिया चे महत्व सांगितले. प्रत्येकाने आर्ट ऑफ लिव्हिग परिवाराशी जोडले पाहिजे व आपल्या जीवनात बदल करून घेतला पाहिजे. स्वतःच्या शरीरासाठी योगाचे ज्ञान आवश्यक असल्याचे मत श्री सौताडेकर यांनी व्यक्त केले. यावेळी योग शिबिराचे आलेल्या अनुभवाचे कथन साधक डॉ. प्रवीण गव्हाणे, डॉ. अनिता गव्हाणे, ॲड. संदीप कामशेटे, ॲड. शारदा पाटील व इतर काही ने अनुभव कथन केले. योग शिबिराचा आपल्या जीवनात तसा लाभ झाला याबाबत माहिती दिली.
माजी नगरसेविका सौ वर्षा दीपक मुक्कावार व माजी नगरसेवक दीपक मुक्कावार यांनी योग शिक्षक व साधकांचा सन्मान केला. सुप्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल कोत्तावार यांचे अकाली निधन झाल्याबद्दल त्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. योग शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी साधक ॲड.आशिष कुलकर्णी, सेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय बेळीकर, नंदकुमार काचावार, संजय डुमणे, वीरभद्र आप्पास्वामी, डॉ. शोभा पाटील उच्चेकर, स्वप्नजा चंडोळकर, आदीसह अनेक जण उपस्थित होते.