शहीद कुटुंबातील सदस्यांना विधानपरिषद,राज्यसभेवर नियुक्त करावे सतीश पा.भुरेवार -NNL

पालकमंत्री ना.अशोक चव्हाण यांच्याकडे साकडे


मुखेड, रणजित जामखेडकर।
देशाच्या सीमावर्ती भागासह अंतर्गत सुरक्षा कर्तव्य बजावताना देशाचे संरक्षणार्थ दहशतवादी अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिक च्या व पोलिस प्रशासनातील कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोठ्या अडचिणना यातना ना सामोरे जावे लागते त्यांच्या प्रश्न ला वाचा फोडण्यासाठी त्यांचे प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्यासाठी शहीद कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य क्रमाने विधानपरिषद व राज्य सभेवर नियुक्त करवून कुटीबीयांना न्याय द्यावा हीच शहीद सैनिक जवान प्रति खरी श्रद्धांजली असेल अश्या मागणीचे निवेदन शहिद कुटुंबातील सदस्य सतीश पाटील भूरेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोशरी ना अशोकराव चव्हाण यांसाकडे मुंबई येथे विधिमंडळ अधिवेशन दरम्यान नुकतीच केली आहे.

तालुकयासह जिल्ह्यात परिसरात अनेक गावातील सैनिक जवान देशच्या सीमेवर देश रक्षण साठी तैनात असतात तर अंतर्गत सुरक्षा व्यवस्था साठी विविध विभागातील पोलीस प्रशासन सुद्धा आपले कर्तव्य चोखपणे बजावतात या दरम्यान अप्रिय घटना दहशतवादी हलले अतिरेकी हल्ल्यात अनेकदा त्याना आपला जीव गमवावा लागतो शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांना अनेक अडचणी यातना गैरसोयीला सामोरे जावे लागते यादरम्यान मानसिक सामाजिक आर्थिक आधारची त्याना अत्यन्त आवश्यकता असते शहीद कुटुंबातील सद्सयच्या हक्क मागण्या अडचणी ची सोडवणूक करण्यासाठी शहीद कुटुंबातील सदस्यांना राज्यच्या वरिष्ठ सभागृह विधान परिषद व संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा वर नियुक्ती करावेत अशी मागणी सतीश पाटील भुरेवार यांनी निवेदनद्वारे राष्ट्रवादी राज्यपाल मुख्यमंत्री पालकमंत्री विरोधी पक्षनेते यांच्याकडे अधिवेशन दरम्यान केली आहे ना अशोकराव चव्हाण यांनी भुरेवार कुटुंबातील सदस्य ची आस्थेवईक पणे विचराना केली मागील काळातील शहीद पारिवारिक सदस्य बद्दल शोक व्यक्त केला.

सतीश भूरेवार यांचे वडील नागनाथ भूरेवार हे १९७३ साली पोलीस विभागात कर्तव्य बजवत असताना व कार्यरत असताना तातक्लीन मुख्यमंत्री कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या बंदोबस्त ताफ्यला अपघातात शहीद झाले तर त्यांचे काका कै गोविंदराव भुरेवार हे १९७८ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून वाढवना ता उदगीर जी लातूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना कर्तव्य बाजवंताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नांमातर प्रकरणी आंदोलन दरम्यान जमाव हलयात ते शहीद झाले अंत्यसंस्कार साठी प्रेत सुद्धा उपलब्ध झाले नाही यानंतर भुरेवार कुटूंबियांना अत्यंत संघर्ष करावा लागला असून त्यांची शासन दरबारी मोठी उपेक्षा झाली आहे असे उद्विग्न भावना सतीश पा. भुरेवार यांनी व्यक्त केली ना. अशोकराव चव्हाण यांनी शहीद कुटुंबातील सद्सयच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा लक्ष घालावे अशी मागणी त्यानी प्रत्यक्ष मुंबई येथे भेटून केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी