नांदेड, अनिल मादसवार| आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भरवण्यात आलेल्या शेतीमालाच्या विविध स्टॉलला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी आवर्जून भेट दिली. आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्याकडून खरेदीही केली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की जे पिकेल ते नक्कीच विकेल पण त्यासाठी नियोजन, योग्य बाजारपेठ आणि बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी आता कोणाच्या हाताकडे न पाहता आपल्या मालाला नेमका कुठे चांगला भाव मिळतो ते शोधला पाहिजे आणि विकला पाहिजे व आत्मनिर्भर बनले पाहिजे असे मत व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने धान्य महोत्सव 2022 आयोजित प्रसंगी सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांचे आवाहन, पुढे बोलताना ताई म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीकडे शेतकरी वळतो आहे. व आत्मनिर्भर बनतोय हे निश्चित कौतुकास्पद आहे हे त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या शेतकऱ्यांनी नव्या जोमाने उमेदीने येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत जगण्याची नवी ऊर्जा प्राप्त करावी व स्वतःच्या मालाची थेट विक्री करून स्वतः मालक बनावं ही काळाची गरज आहे.
शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालाची थेट विक्री करून स्वतः मालक बनावं ही काळाची गरज आहे. गतवर्षी सुद्धा पिकेल ते विकेल कार्यक्रमा अंतर्गत खा.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांसोबत सौ.प्रणिताताई यांनी भेट दिली होती. प्रसंगी 75 स्टॉलद्वारे थेट मालविक्री करण्यात आली. शेतकऱ्यांनी नैसर्गिक रित्या स्वतःच्या शेतामध्ये पेरू, कडधान्य, पापड, मसाले, लोणचे, स्ट्रॉबेरी अशा विविध प्रकारचे स्टॉल शेतकऱ्यांनी स्वतः सर्व विक्रीसाठी उभारले होते सर्व स्टॉलला भेट देऊन नैसर्गिक रित्या मालक कसा पिकवला जातो याची माहिती घेतली व सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी स्वतः शेतकऱ्यांकडून खरेदी सुद्धा केली.
तीन दिवस चालणाऱ्या या शेतकऱ्यांच्या धान्य महोत्सव प्रदर्शनास सर्व नांदेडकरांनी भेट देऊन सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे असे त्यांनी शेवटी आवाहन केले यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीणभाऊ साले, महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य शितलताई भालके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिलीपभाऊ ठाकूर, रविशंकर चलवदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड, श्रीमती माधुरी सोनवणे, प्रकल्प संचालक आत्मा, रवीकुमार सुखदेव उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड, डॉ.देविकात देशमुख कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड, अरुण घुमनवाड तालुका कृषी अधिकारी लोहा आदि मान्यवर उपस्थित होते.