नांदेड| बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील सरपंच राजेश्वर व्यंकटराव पाटील यांना सरपंच सेवा संंघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
राजेश्वर पाटील यांनी आपल्या गावात शासकीय विविध योजना तसेच विकास कामे करुन तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नाव लौगिक मिळविला आहे. यांच्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.
त्यांच्या या पुरस्काराबद्दल आ. रितेश अंतापुरकर, नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, शिवाजी पाटील पांचपिपळीकर, उद्योजक सुरेश इटगावले, अशोक तेलगुंठे, दिलीप पांढरे, आनंदराव अनंतवाड यांच्यासह तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिकांनी अभिनंदन केले आहे.