नांदेड| अक्षरोदय साहित्य मंडळाचे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य प्रकाराला मंडळाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरवले आहे.
या वर्षीचे पुरस्कार मानकरी खालील प्रमाणे आहेत यशपुष्प - डॉ. आशुतोष रारावीकर मुंबई, खोसाटा- डॉ. प्रभाकर शेळके जालना, कैवार- डॉ. शिवाजी शिंदे सोलापूर, हिरवं सपन- प्रा. दर्शना देशमुख लातूर, आकाशवीणा- वीणा रारावीकर मुंबई, मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणस- हबीब भंडारे औरंगाबाद, उमंग- व्यंकटेश काटकर नांदेड, आयुष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या- माधुरी चौधरी औरंगाबाद, समतेच्या डोहाकाठी- चंद्रकांत कदम नांदेड, आम्ही फुले बोलतोय- भारत सातपुते लातूर, जीवन घडतांना- मनोहर भोळे नांदेड, उन्हात घर माझे- नितीन भट अमरावती, शब्दाचं चादणं- माया तळणकर नांदेड, उजेड- सुजाता पोपलवार नांदेड, गावगंध- मिलिंद जाधव नांदेड, शब्द क्रांती- उत्तम कानिंदे व रमेश मुनेश्वर नांदेड, आता लढलेच पाहिजे- बालिका बरगळ नांदेड,
तुकोबांच्या कुळाचा वंश- संतोष कांबळे - नाशिक, डोहतळ- मारोती कटकधोंड सोलापूर, शिंपल्यातील मोती- डॉ. संगीता अवचार नांदेड, आठवणीच गाठोडं- मोतीराम राठोड हे पुरस्कार दि. २७.०३.२०२२ रोजी पीपल्स कॉलेज येथिल परिसरात स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षा जेष्ठ साहित्यिका मा. मंगलाताई फुलारी उदघाटक जेष्ठ कथाकार मा.दिगंबर कदम प्रमुख पाहुणे जेष्ठ नाट्यकर्मी डॉ. विजयकुमार माहुरे व मंडळाचे राज्याध्यक्ष मा. मारुती मुंडे यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
पुरस्कार वितरण सत्राचे सूत्रसंचालन कादंबरीकार मा. चंद्रकांत चव्हाण हे करणार आहेत व आभार कवी. सदानंद सपकाळे करतील लागलीच कविसंमेलन या दुसऱ्या सत्राची सुरवात करण्यात येणार आहे या कवी संमेलनाचे अध्यक्षा जेष्ठ साहित्यिका सिंधुताई दहिफळे हिंगोली हे राहणार आहेत व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील लोकप्रिय कविकट्टा संचालक अशोक कुबडे हे राहणार आहेत कविसंमेलनाचे सूत्रसंचालन मा. नरेंद्र धोंगडे व आभार उषाताई ठाकूर या करणार आहेत या कविसंमेलनासाठी नांदेड जिल्ह्यातील निमंत्रित कवींचे कविसंमेलन घेण्यात येणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे व कविसंमेलनाचे नियोजन मंडळाचे राज्य सदस्य मा. पंकज कांबळे, विनय कैरंमकोंडा, आतिष कुमार आठवले व सदानंद सपकाळे हे करत आहेत
२७ मार्च रोजी होणार ''अक्षरोदय'' कवीसंमेलन
नांदेड येथील सुप्रसिद्ध अक्षरोदय साहित्य मंडळ यांचे २७ मार्च २०२२ रोजी होणार ''अक्षरोदय'' कवीसंमेलन या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिका मा.सिंधूताई दहिफळे हिंगोली या राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील लोकप्रिय कविकट्टा चे संचालक मा. अशोक कुबडे हे राहणार आहेत हे कवीसंमेलन निमंत्रितांचे कवी संमेलन असून, या कवी संमेलनासाठी नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी यांना पाचारण करण्यात आले आहे.
यामध्ये मान्यवर कवी आहेत प्रा. महेश मोरे, मारोती मुंडे, श्रीनिवास मस्के, बालाजी पेटेकर, ज्योती गायकवाड, वंदना मघाडे दत्ता वनजे, शिवाजी होळकर, बालिका बरगळ, उषा ठाकूर, माया तळकर, अरुणा गरजे, रूपाली वगरे, शरदचंद्र हयातनगरकर, रुचिरा बेडकर, सदानंद सपकळे, चंद्रकांत चव्हाण, नरेंद्र धोंगडे, निशांत पवार, गजेंद्र कपाटे, गजानन हिंगमीरे, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, माधव जाधव, अनुराधा हवेलीकर, एन सी भंडारे, मोहनराव कुंटूरकर, मोहनराव बुक्तरे हे कविसंमेलन पीपल्स कॉलेज परिसर मध्ये स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र सभागृह येथे ठीक ११ वाजता संपन्न होणार आहे साहित्यिकांनी कविसमेलनाचे रसपान करावे हे आव्हाहन मंडळाचे राज्याध्यक्ष मारोती मुंडे यांनी केले आहे