आपल्या हक्कासाठी दि २९ पासून बेमुदत धरने दि. ३० मार्चला एल्गार मोर्चा आयोजित
नांदेड| जिल्ह्यातील दिव्यांग वृध्द निराधार यांना त्यांचे हक्क व त्यांचे प्रलबित २०१९ पासुन असलेले प्रश्न तहसिलदार यांचे सात व गटविकास अधिकारी यांचे नऊ प्रश्ना का..? सुटत नाहीत यांचे लेखी ऊतर दि ९ मार्च २०२२ पर्यंत देण्यात यावे म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना दि.१४ फ्रेबु ते ४ मार्च २२ पर्यंत दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष भेटून चर्चा करुन निवेदण देण्यात आले होते. त्या प्रश्नाचे लेखी ऊतर दि ९ मार्च पर्यंत न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बेमुध्दत धरणे अनेक प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा देऊनही नादेड जिल्ह्यातील सोळा तहसिलदार पैकी दोन तहसिलदार यांच्याकडुन विचारलेल्या प्रश्नाला न उत्तर देता पुढील कार्यवाहीसाठी पाठविले व चौदा तहसिलदार साहेब यांना दिव्यांगाना न्याय तर नाही दिला पण साधे निवेदनाचे ऊतर देता आले नाही हि प्रशासनाची शोकांतिका आहे.
नांदेड जिल्ह्यातील सोळा गटविकास अधिकारी पैकि फक्त हदगाव गटविकास अधिकारी यानी प्रत्येक प्रश्नाचे लेखी ऊतर दिल्याबदल त्यांचे धन्यवाद तर तिन गटविकास अधिकारी फक्त पुढील कार्यवाही साठी पाठविले तर चौदा गटविकास अधिकारी यांना दिव्यांगाच्या निवेदनाचा का विसर पडला.नांदेड जिल्ह्यातील तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना दिव्यांगाचा निवेदनाचा विसर पडला म्हणून दि ११ मार्च २२ रोजी दिव्यांग कक्ष अधिकारी जि प नांदेड यांना दिव्यांग शिष्टमंडळानी भेटुन निवेदन दिले कि, नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना पडत झडत मुदतीत लेखी ऊतर न दिल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना दिव्यांग कक्ष जि प. नांदेड यांना लेखी निवेदन देऊन त्यांच्या मार्फत निवेदनाची वरील अधिकारी यांच्याकडुन आठ दिवसांत दिलेल्या प्रश्नांचे ऊतर मागनी करावी.
नसेल तर नाईलाजाने दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी बेमुदत धरने अनेक प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा देऊनहि न्याय हक्कासाठी साधे ऊतर मिळाले नसल्यामुळे दि २९ मार्च पासून बेमुदत धरने दि ३० मार्च ला समविचारी संघटनेकडून एल्गार मोर्चा काढण्यात येईल असे लेखि निवेदन राज्याचे मा. मुख्यमंत्री साहेब मा. राज्यपाल साहेब, मा. उपमुख्यमंत्री, व अर्थमंत्री साहेब मा. समाज कल्यण,मंञी साहेब मा. दिव्यांग आयुक्त साहेब मा. बच्चु भाऊ कडू राज्यमंञी मा. मुख्यसचिव साहेब, मंञालय यांना नांदेड चे.मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या कडुन वरील मंञीमहोदय यांना शिष्टमंडळ यांनी निवेदनाद्वारे चर्चा करुन बेमुदत धरने आंदोलनाचा दिला इशारा या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष चपतराव डाकोरे पाटिल, जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले जि संपर्क प्रमुख नागोराव बंडे, दिगाबंर लोणे, सचिन कुंटुरवार, हंबर्डे दता, रंजीत पाटिल, ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिद्ध पञक दिले आहे.