नविन नांदेड| संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बिजोत्सव व धारुमाता मंदिर वर्धापन दिना निमित्त १४ ते २१ मार्च रोजी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. २१ मार्च रोजी हभप कागदे महाराज यांच्या काल्याचा किर्तनाने व महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता झाली.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बिजोत्सव व धारुमाता मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित मौ. विष्णुपुरी येथे दिनांक १४. ते दिनांक २१ मार्च पर्यंत २०२२ पर्यंत वै.ह.भ.प.मामासाहेब मारतळेकर व काळबा महाराज हरबळकर यांच्या कृपाआशिवादाने तसेच ह.भ.प. राजेजी महाराज, हनुमान मंदीर पुजारी, विष्णुपूरी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता.
दैनंदिन कार्यक्रम मध्ये काकडा भजन ,गाथा पारायण,गाथा भजन ,संत तुकाराम महाराज चरित्र, हरिपाठ, हरि किर्तन, आयोजित करण्यात आले होते या सप्ताहात हभप पवन महाराज अहमदपूरकर, हभप ज्ञानोबा माऊली मुडेकर महाराज ,हभप दिपक गुरू महाराज पांगरेकर, हभप बंडुदेव महाराज ईटोलीकर,हभप अशोक इदगे महाराज आंळदीकर, हभप वासुदेव महाराज कोलंबीकर, हभप नंदकिशोर महाराज अजरसोंडेकर, यांच्ये किर्तन आयोजित करण्यात आले होते.हभप वैजनाथ बापु महाराज कागदे यांच्ये काल्याचे किर्तन , रविवार दिनांक २० रोजी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बिजोतसव निमित्ताने सकाळी १० ते १२ हभप बालाजी महाराज गुडेवार यांचे गुलालाचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी रामराव हंबर्डे, शंकरराव हंबर्डे, उध्दव नामदेवराव हंबर्डे , विश्वनाथ हंबर्डे, अनिल हंबर्डे,राजु हंबर्डे, तुकाराम हंबर्डे, प्रकाश हंबर्डे, बालाजी हंबर्डे माधव हंबर्डे, ज्ञानेश्वर हंबर्डे, मारुती हंबर्डे मारुतराव हंबर्डे हनुमान घोरपडे यांच्या सह , व्यवस्थापक , गावकरी मंडळी विष्णुपुरी यांनी परिश्रम घेतले.