नगरविकास मंत्री यांच्या सह पदाधिकारी समवेत चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न
नविन नांदेड| सिडको नागरी हक्क विकास परिषद वाघाळा शहर नविन नांदेड चा वतीने सिडको कार्यालया समोर विविध मागण्यासाठी साखळी उपोषणास शिवसेनेचे दक्षिण सह संपर्क प्रमुख दक्षिण सह संपर्क प्रमुख दिपक शेंडे व शिवसेना पदाधिकारी यांनी भेट देऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा करून सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
सिडको प्रशासनाने २००४ -५ मध्ये १०० टक्के विलंब आकार व्याज माफी योजना राबविली होती ती पुन्हा राबविण्यात यावी, सिडको हडको घरावरील १०० टक्के व्याज माफी देऊन मुळ मालकांच्या अनुपस्थित घरे हस्तांतरित करण्यात यावे,घरधारकांनी पुर्ण पैसे भरलेले आहेत सिडको प्रशासकाच्या सहीने नावाची यादी जाहीर प्रगटन दिलेल्या घरघारकाचे घरे हस्तांतरित करून द्यावे या मागणीसाठी सिडको नागरी हक्क विकास परिषद यांच्या वतीने दि.२१ मार्च पासून सिडको कार्यालय समोर साखळी उपोषणास सुरुवात केली असून अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनटक्के, उपाध्यक्ष भिमराव बेरजे, सरचिटणीस अशोक मगरे, कोषाध्यक्ष मल्लिकार्जुन पदरगे, सल्लागार यांच्या सह पदाधिकारी बसले आहेत, दरम्यान या साखळी उपोषणास माजी उपशहर प्रमुख प्रमोद मैड यांनी पांठीबा दर्शविला आहे.
या उपोषणाला शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख दिपक शेंडे यांनी भेट देऊन मुख्य प्रशासक , सिडको प्रशासक यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधुन माहिती घेतली व चर्चा केली. यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकटेश मामीलवाड, नांदेड तालुका उध्दव पाटील शिंदे, नांदेड शहर तुलजेश यादव, सिडको शहर प्रमुख तुलजेश यादव,माजी शहरप्रमुख साहेबराव मामीलवाड,माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कदम, संभाजी जाधव, पप्पु गायकवाड, संतोष देशमुख,कृष्णा पांचाळ, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सहसंपर्क प्रमुख शेंडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षाचे सचिव अनिल देशमुख यांच्या सोबत चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.