हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने दि.२१ सोमवारी हिमायतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांनी साथ दिलीतर एकत्र निवडणूक लढवू अन्यथा राष्ट्रवादि काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी सक्षम आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तथा हिमायतनगर तालुका पक्ष निरीक्षक दत्तराव मोहिते यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना दिली.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक हिमायतनगर शहरातील आंबेडकर चौकात असलेल्या सरदार खान यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला या बैठकीस उपस्थित झालेले जिल्हा सरचिटणीस तथा हिमायतनगर तालुका पक्ष निरीक्षक दत्तराव मोहिते किनवट-माहूर विधानसभा सरचिटणीस मनोज कीर्तने यांचा शाल श्रीफळ देऊन हिमायतनगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत सत्कार करण्यात आले. त्यानंतर सुरु झालेल्या आढावा बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांनी आपापली मनोगत व्यक्त केली. या बैठकीस उपस्थित झालेल्या अनेकांनी आपली मते व्यक्त करताना समविचारी पक्षाकडून सन्मानाची वागणूक मिळाल्यास एकत्र निवडणूक लढविण्यास हरकत नाही. मात्र सोबत घेण्याचे आश्वासन देऊन मागील काळानुसार पाठीत खंजरी खुपसण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हा परिषद व नगर पंचायत निवडणून स्वबळावर लढविल्याशिवाय पर्याय नाही असे उपस्थित कार्यकर्तानी बोलून दाखविले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यात अव्वल नबंरचा पक्ष आहे, ग्रामदिन भागात आपली संख्या कमी असली तरी प्रत्येकाच्या मनात राहस्त्रवाडी पक्षासाठी अनुकूल स्थान आहे.पक्षाचे सर्वेसर्व शरद पवारजी साहेब, उपमुख्यमंतरी अजितदादा पवार यांच्या कामावर सर्वजण समाधानी आहेत. आजवर झालेल्या निवडणुकीत अपयश आले असले तरी आपला उमेदवार हा दोन नंबरच्या क्रमांकावर राहिलेला आहे. आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा rआम्ही राज्याप्रमाणे वरिष्ठांच्या सूचनेनुसार निवडणूक लढविण्यास अनुकूल आहोत. जर येथील काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाहीतर काँग्रेस सोडून शिवसेना पक्षासोबत निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे.
यातही जर आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार स्वबळावर निवडणूक लढवून जास्तीस्त जास्त जागा कश्या निवडून आणता येतील यासाठी आमही सर्वजण प्रयत्न करणार असल्याचा निर्धार उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पक्षनिरीक्षका समोर व्यक्त केला. यावेळी पक्ष निरीक्षक दत्तराव मोहिते यांनी सांगितले कि, निवडणुकी संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून पक्षाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे आणि जास्तीत जास्त मतदान कसे मिळविता येईल यासाठी प्रयत्न करावे अश्या सूचना त्यांनी बैठकीत केल्या. यावेळी बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, युवा जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष उदय देशपांडे, इरफान खान पठाण, माजी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, आदींसह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.