नांदेड| महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ प्रणित छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष गिरीशभाऊ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर काकडे, प्रदेश प्रवक्ते अॅङ. दिगांबर देशमुख, प्रदेश सचिव देवीदास मोरे, प्रदेश कोषाध्यक्ष संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली चैतन्य नगर, शिवविजय कॉलनी येथे बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी गजानन पाटील कहाळेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांना प्रदेशाध्यक्ष गिरीषभाऊ जाधव, संजय कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी दत्ता खराटे, किरण ज्ञानेश्वर कदम, अजय हंबीरे, अवधूत गोणारकर, नारायण चक्रधर, विठ्ठल पुटेवाङ, जोरगेवर सतीश, गुडमलवर, किशन हलदेवर, कृष्णा गुडमलवर, ज्ञानेश्वर कदम, नागेश कहाळेकर, अजय हंभीरे आदी पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. गजानन कहाळेकर यांच्या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.