बाबुराव केंद्रे उमरगेकर यांनी वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कमान उभारली
लोहा/कंधार/नांदेड| कंधार - घोडज या मुख्य रस्त्यावरील भगवान बाबा गडाकडे जाणार्या रस्त्यावर श्रीभगवान गड महाद्वार कमानीचा लोकार्पन सोहळा महाशिवराञीचे औचित्य साधुन ह.भ.प नामदेव महाराज दापकेकर याच्या शुभहस्ते लोकार्पन करण्यात आले.
कंधार शहरापासुन जवळच असलेल्या घोडज रोडवर भगवान बाबाचे भव्य आणि दिव्य मंदीर आहे. या मंदीराच्या मुख्य रस्त्यावर कंधार कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे उमरगेकर यानी आपले वडील स्वा. सै. कै भानुदासराव गोविंदराव पाटील केंद्रे उमरगेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व वडीलानी केलेल्या सामाजिक व राष्ट्रीय कार्याची ओळख चिरंतर राहावी या उद्देशाने जवळ पास दोन ते तीन लाख रुपय खर्च करुन श्रीभगवान गड महाद्वार कमान उभारली आहे.
त्या कमानीचा लोकार्पन सोहळा नुकताच ह.भ.प नामदेव महाराज दापकेकर यांच्या हास्ते करण्यात आला. यावेळी कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे उमरगेकर, नांदेड येथील मुंडे कोचिन क्लासेसचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. नारायनराव मुंडे, भगवान बाबा या ट्रसचे अध्यक्ष डाॅ. दिनकर जायभाये, भगवान मुंडे, नामदेव महाराज केंद्रे, अरूण करेवाड, ज्ञानोबा घुगे, बी.एस मुंडे, दत्ता मुंडे, रत्नाकर केंद्रे, संग्राम कागने, सामाजीक कार्यकर्ते राजु गित्ते, हाणमंत नागरगोजे, माधव केंद्रे, संजय जायभाये, गुणवंत केंद्रे, ज्ञानोबा तिडके, भाऊसाहेब केंद्रे उमरगेकर, बालाजी केंद्रे, पञकार प्रल्हाद दे. आगबोटे, संभाजी केंद्रे नाथराव केंद्रे, बाळासाहेब गर्जे, शिवाजी शेळके, पेंटर मारोती बेंबळगे, मच्छिंद्र मुंडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेञातील मान्यवर अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्यनी ऊपस्थित होते.
यावेळी कमानीचे शिल्पकार ज्ञानोबा घुगे संगमवाडीकर व प्रसिध्द पेंटर मारोती बेंबळगे यांचा माजी सभापती बाबुराव केंद्रे उमरगेकर याच्या हास्ते त्याचा शाल श्रीफळ व पुष्षहार घालुन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुंदर सुञसंचलन दत्ता मुंडे यानी केले आहे