जागतिक महिला दिनानिमित्त भूमि अभिलेख कार्यालयातील महिलांचा गौरव -NNL

स्वामीत्व योजनेअंतर्गत महिलांच्या नावे असलेल्या मिळकतीच्या सनदचे वितरण

नांदेड। महिला सक्षमीकरण कार्यक्रम व प्रशिक्षणाचे (स्वामीत्व कामाचे प्रशिक्षण व सनद वाटप) आयोजन भूमि अभिलेख विभागातील महिला कर्मचाऱ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनानिमित्त आज जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

स्वामीत्व योजनेअंतंर्गत मौजे पोखर्णी, वाणेगाव, दर्यापुर व थुगाव या गावातील तयार झालेल्या महिलांच्या नावे असलेल्या मिळकतीच्या सनदचे वितरीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया, उपअधीक्षक भूमि अभिलेख एन. आर. उंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

महिलांचे आरोग्य, महिला विषयक कायदे व अर्थिक बचत याबाबत डॉ. निलेश बास्टेवाड, ॲड. छाया कुलकर्णी, प्रवीण पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात भूमि अभिलेख विभागातील महिला कर्मचाऱ्यांना विभागातील विविध विषयांचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात भूमि अभिलेख कार्यालयातील   एन. एच. पिंपळगावकर, मो. जाकीर, यु. जे. गुंडाळे, ऐ. के. ढाके, एस. जी. सुर्यवंशी, के. एस. कांबळे, ए. क. झरकर, श्रीमती एस. व्हि. तोटावार यांनी मार्गदर्शन केले. जिल्हयातील भूमि अभिलेख कार्यालयातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील श्री. नलमेलवार, श्री. दळवे, श्री. इंगळे आदींनी सहभाग घेतला. यावेळी जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार  श्रीमती के. जी. कुलकर्णी यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी