सिरंजनी येथे धुलीवंदन निमित्त रंगला कुस्तीचा फड -NNL

मलेश्वर शेंनेवाड बोरगडीकर यांनी पटकावली मानाची कुस्ती..


हिमायतनगर।
मौजे सिरंजनी ता.हिमायतनगर येथे धुलिवंदन च्या दिवशी दर वर्षी महाराष्ट्राची शान असलेला मैदानी खेळ कुस्ती चा फड रंगतो. याही वर्षी गावकऱ्यांनी धुलिवंदन निमित्त मोठ्या उत्साहात परंपरागत चालत आलेल्या कुस्तीचे आयोजन केले होते. 

ह्या फडात दरवर्षी नामवंत पैलवनांची हजेरी असते व पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन नागरिक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. लहान मोठ्या पैलवणाच्या 100 पेक्षा अधिक रंगतदार कुस्त्या आजच्या फडात बघायला मिळाल्या. गावचे प्रथम नागरिक सौ.मेघा पवन करेवाड यांच्या तर्फे मानाच्या कुस्तीसाठी रोख रक्कम 2001 रु व शाल श्रीफळ ठेवण्यात आले होते.

शेवटची मानाची कुस्ती सिरंजनी येथील नामवंत पैलवान हनुमान कलेवाड व बोरगडी येथील पैलवान मलेश्वर शेंनेवाड यांच्यात रंगली. खूप वेळ चाललेल्या ह्या रंगतदार कुस्तीत बोरगडी च्या पैलवनाने बाजी मारली.

गावातील मारोती मंदिरात विजयी पैलवान यांना पारितोषिक देऊन कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली. हा फड यशस्वी करण्यासाठी गणेश भींबरवाड, दत्ता म्याकलवाड, अविनाश अंचेटवाड,दयाकर सुदेवाड, दत्ता मिस्त्री यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून पै.जयवंतराव देशमाने, पै.बब्रुवाहन गडमवार, राजेश्वर कोंगरवाड, देविदास करेवाड यांनी जबाबदारी चोख पणे पार पडली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी