पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियान 20 व्या वर्षीही 100 टक्के यशस्वी -NNL

मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून रोखले खडकवासला जलाशयाचे प्रदूषण !   


पुणे|
धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे 'खडकवासला जलाशय रक्षण अभियान' सलग 20 व्या वर्षीही 100 टक्के यशस्वी झाले. हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान 18 मार्च या दिवशी राबवण्यात आले. या वेळी 100 हून अधिक उपस्थित कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून रंग खेळून येणार्‍यांना रोखले अन् त्यांचे प्रबोधनही केले. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे हे धर्मशास्त्र विसंगत आहे. 

हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमा पुजनाने अभियानाला प्रारंभ झाला. या प्रसंगी आयुर्वेद गोविज्ञान कौन्सिलचे संचालक, गव्यशास्त्री डॉ. स्वानंद पंडित यांनी नारळ वाढवून अभियानाचे उद्घाटन केले. या वेळी आयुर्वेद गोविज्ञान कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक भोसले, इतिहास अभ्यासक नंदकिशोर मते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सनातन संस्थेचे श्री. विठ्ठल जाधव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी समितीच्या कार्याला पाठिंबा दर्शवला आणि या अविरत कार्याचे कौतुक केले. हिंदु जनजागृती समिती मागील 19 वर्षे हा उपक्रम राबवत आहे. हे सातत्य वाखाणण्याजोगे आहे. संपूर्ण दिवसभर जलाशयाचे रक्षण करणे हे सामाजिक बांधिलकीचे काम ही संस्था करत आहे. यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होऊन सर्वाना शिस्त लावण्याचे कार्य करत आहेत असे म्हणून उपस्थित मान्यवरांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले.

खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकिर, खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पोपटराव शेलार, खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र राऊत आणि दत्तात्रय कापसे, पुणे मनपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, गोर्‍हे ग्रामपंचायत सदस्य बाबा खिरीड, साहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे आणि ग्रामस्थ यांनीही अभियान स्थळी भेट दिली. प्रबोधनानंतर अनेक नागरिकांनी अभियानाचे विशेष कौतुक केले.

प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी 9 पासून सायंकाळी 7 पर्यंत जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून अभियान राबवण्यात आले. या अभियानाला पोलीस-प्रशासनाचेही उत्तम सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 22 मार्चलाही हे अभियान राबविण्यात येणार आहे. 

श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,हिंदु जनजागृती समिती, (संपर्क क्रमांक : 89833 35517)


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी