महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज--डॉ. सुजाता पाटोदेकर -NNL


नांदेड| 
महिलांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून एका ठराविक आयुष्याच्या परिघाबाहेर पडतांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. सुजाता पाटोदेकर यांनी केले. दीपकनगर तरोडा बु. भागातील श्री निकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला पालक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सहसचिव तथा  श्रीनिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. एस. एन. राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुजाता पाटोदेकर, जिल्हा स्काऊट गाईड च्या सौ. शिवकाशी तांडे,सौ.भगिरथी बच्चेवार, सारिका सब्बनवार ,सौ.मीना झाडबुके, डॉ. ज्योत्स्ना आळणे,-वैद्य, अँड. ज्योती कांबळे, अधिव्याख्याता डॉ. एस.व्ही.बेड्टीगेरी, सेवानिवृत्त  मुख्याध्यापिका सौ.उषाताई गैनवाड,सौ ज्योती कदम, मुख्याध्यापक यशवंत थोरात, अधिव्याख्याता प्रा.पी.के.विनकरे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमात सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिला पालक मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना डॉ. सुजाता पाटोदेकर म्हणाल्या महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांनी सकस आहार,व्यायाम करून स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवणे काळाची गरज असल्याचे सांगून महिलांनी विचारलेल्या आरोग्य विषयक प्रश्नांचे उत्तर त्यांनी यावेळी देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिलांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवायचे असतील तर महिला पालकांनी आपल्या मुलींना उच्चशिक्षित करणे काळाची गरज आहे. आपण आपल्या मुलींना वेळेवर शाळेत पाठवून ती काय शिकते. तिच्या अडचणी बाबत तिच्याशी संवाद साधने महिला पालकांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एस.एन. राऊत यांनी अध्यक्षीय समारोप करताना करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा, महिला पालकांचा व शाळेतील महिला शिक्षकांचा डॉ.  एस एन राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी महिलांच्या कार्याबाबत गौरवोद्गार काढून स्वतः खंबीर होण्याबाबत सूचना करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील  शिक्षिका श्रीमती उर्मिला सोनवणे,कांचन सोनकांबळे,नीता जगधने, सुरेखा मरशिवणे, प्रतिभा मोरताडकर, शिवाजी माळेगावे, प्रल्हाद आयनेले, श्रीधर पवार, सुदर्शन कल्याणकर, बाळकृष्ण राठोड,मगरे,मोगल, व्हनशेट्टे,दंडेकर, कळकेकर, परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्र संचलन,सौ.निता जगधने तर उपस्थितीतांचे आभार सौ.कांचन सोनकांबळे यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी