अध्यक्षिय भाषणात गोविंदराम शूरनर म्हणाले,मान्यवर कांशीराम यांनी देशात बहुजन क्रांती घडवून आणून बहुजन समाजाला सन्मान मिळवून दिले, तसेच एका शेतकरी मेंढपाळ गरीब कुंटूबात जन्मलेले मल्हारराव सैन्यात भरती होऊन शिलेदार - सरदार - सुभेदार पद भुषवून राजा बनले आणि आपल्या कर्तृत्वावर सम्राट झाले. या सम्राटांनी ज्या काळात स्रिला तुच्छ समजले जाई त्या काळात विधवेचे पुनर्विवाह घडवुन आणले, राणी गौतमाबाई व सुन अहिल्याबाई यांना राज्यकारभारात घेतले. एवढ्यावरच न थांबता सती जाणाऱ्या सुनेला सती जाण्यापासून रोखले आणि राज्याची वारसदार बनविले. त्यामुळे मुळेच सम्राज्ञी अहिल्याबाईने जात धर्म आड येवू न देता संपूर्ण भारतात लोक कल्याणकारी कार्य केली. सनातनी पेशवाई काळात ही अहिल्याबाईने आदर्श राज्यकारभार करून दाखविली हे कार्य सम्राट मल्हाररावानी स्रिला संपूर्ण अधिकार प्राप्त करून दिल्यामुळेच घडू शकले.
आजच्या पिढीने सम्राट मल्हारराव होळकर यांचे आदर्श घेवून दिल्लिची सत्ता हस्तगत करावी असे प्रतीपादन गोविंदराम यांनी केले. या कार्यक्रमाला विठ्ठल पातेवार, विश्वनाथ खरात, नितिन सापनर, जंगले, शिंदे,संतोष गंगोत्री, सोनकांबळे व इतर वाचक वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सावित्रा शूरनर केले,तर आभार मदनेश्वरी शूरनर यांनी मानले.