स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित,बानो एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित कै.वंसतराव काळे वरीष्ठ महाविद्यालय देगलुर नाका नांदेड चा राष्ट्रीय सेवा योजना पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत धनेगाव मुजामपेठ येथे २१ ते २७ मार्च दरम्यान येथ शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिराचे उदघाटन २१ मार्च रोजी राज्याचे माजी राज्यमंत्री डि .पी .सावंत यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डि.बी. जाभंरूणकर, वाजेगाव जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे पाटील , धनेगाव- मुझामपेठचे सरपंच गंगाधर ( पिंटु ) पाटील शिंदे , माजी पंचायत समिती सदस्य भुजंगराव भालके, युवा नेते राहुल हंबर्डे , ग्रामपंचायत सदस्य तातेराव ढवळे, अब्दुल गफार,रफिक , राजेश बोटलवार, शिवाजी बुचडे, फारूक,पोलीस पाटील, गोपीचंद पाटील धनेगावकर, संरपच गोविंदराव वांगीकर, रमेश मोरे, माधवराव देशमुख यांचासह मान्यवरांच्यी उपस्थिती होती.
यावेळी माजी राज्यमंत्री सांवत यांनी मुलीने शिक्षणात अग्रेसर राहीले पाहिजे, मतदानाचा अधिकार, संगणक प्रणाली या सह शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण बाबी सांगितल्या व राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमधिकारी प्रा.बी.एस. बुकतरे यांनी तर सूत्रसंचालन, भांडवलदार, मझरोधदीन मो.खलिललोधदीन यांनी केले तर आभार डॉ.उसमान गणी जैनोधदीन यांनी मानले.
या शिबिरात सात दिवसांच्या कालावधीत स्पर्धा परिक्षा तयारी, भारतीय राज्यघटना, राष्ट्रीय सेवा योजना मध्ये युवकांची भुमिका,महिला सबलीकरण, व्यक्तिमत्त्व विकास,महिला सुरक्षितता कायदे, नागरीकांच्ये मुलभूत अधिकार, बँकिंग क्षेत्रातील संधी, मोफत आरोग्य तपासणी, पर्यावरण संरक्षणात युवकांची भुमिका या बाबत मार्गदर्शन होणार आहे.शिबीर ऊधदघाटन संमारभ सोहळा यशस्वी होण्यासाठी कै.वंसतराव काळे वरीष्ठ महाविद्यालय चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.