नांदेड| शहरातील भगतसिंग चौक असर्जन येथील सॅनफोर्ड इंटरनॅशनल स्कुल मध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी होळी उत्साहात साजरी केली.
होळी व रंगपंचमी निमित्त सॅनफोर्ड इंटरनॅशनल स्कुल मध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील शिक्षिका प्रतिभा रेड्डी सोनावळे, अनिता बोधगिरे, सेविका कल्पना ढगे यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत रंगाची उधळण करत होळी, रंगपंचमी साजरी केली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांवर रंगाची उधळण करत यावेळी गाण्याच्या तालावर ठेकाही धरला.