नांदेड| नातेवाईकास सोडविण्यासाठी १० लाखाची खंडणी मागून फोरव्हीलर गाडीचे नुकसान करणाऱ्या दोघांना विमानतळ पोलीसानी पाळत ठेऊन अटक केली आहे. या दोघांना आज दुपारी न्यायालयात हजार केले असता न्यायाधीश महोदयांनी ३ दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. यामुळे या घटनेच्या पुढील तपास करणाऱ्या पोलिसांना मदत मिळणार आहे.
नांदेड शहरातील गंगानगर सोसायटीमध्ये राहणारे व्यापारी रामाश्रय विश्वनाथ सहाने वय ३७ वर्ष हे दि.१४ मार्च रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना त्यांचे आपल्या चारचाकी वाहन अडवून मोबाईलवर सांगितल्यानुसार आमच्या भावाला तुरुंगातून सोडविण्यासाठी १० लाख रुपये दे... नाहीतर तुला जीवानिशी मारून टाकतो अशी बतावणी करून धमकी दिली. यावेळी सहाणे यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणताच. आरोपी नाग्या पोचीराम गायकवाड आणि आकाश गोविंद लुळे या दोघांनी सहाणे यांच्या गाडीवर तलवारीने हल्ला करून गाडीचे २० हजारांचे नुकसान केले आहे.
घटनेनंतर रामाश्रय सहाणे यांनि दिलेल्या तक्रारीवरुन गुरंन ८६/२०२२ अनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ननवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेख जावेद हे करत आहेत. या घनतेतील आरोपीना तातडीने अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस निलेश मोरे, अधिक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस निरीक्षक संजय ननवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू गिते यांनी तपासाची चक्रे फिरवून एएसआय बाबा गजभारे, हवालदार दारासिंग राठोड, बंडू कलंदर, गंगावरे आणि होमगार्ड केंद्रे यांचे सहकार्याने आरोपीस अटक केली आहे.