सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष- शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.सुमित्रा शंकरराव सोनटक्के , प्रमुख पाहुणे -शा.व्य.स.उपाध्यक्षा सौ.प्रेमला विश्वनाथराव सोनटक्के ,सरपंच सौ. अंतकला संतोष बरूडे,शंकरराव सोनटक्के, विश्वनाथराव सोनटक्के, संतोष सोनटक्के, केंद्रप्रमुख विजयकुमार धोंडगे ,शा.व्यवस्थापन समिती सदस्य मधुकर सोनटक्के ,प्रभाकर सोनटक्के, प्रमोद वानेगावकर, प्रविण सोनटक्के,रामजी सोनटक्के,माजी अध्यक्ष विष्णूदास सोनटक्के मा.सदस्य टोपाजी सोनटक्के,रेखा सोनटक्के ,उपसरपंच सुर्यवंशी, अंगणवाडी पर्यवेक्षिका पाटील , गंगाधर तोडे , एच.डी. राठोड यांच्या हस्ते झाले.
वानेगाव शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या नूूूतन अध्यक्षा,उपाध्यक्षा व सदस्यांचा शाळेतील शिक्षकांनी (एकत्रितपणे )मोठ्या पुुुष्षहाराने जंंगी स्वागत सत्कार केला. तद्नंतर स्वागत गीताने व पुष्पहाराने सर्व मान्यवर व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
सदर प्रशिक्षणाचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले.मात्र सदर प्रशिक्षणातील टेन्ट ,खुर्च्या, मॅट व जेवणाची व्यवस्था ; शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.सुमित्रा शंकरराव सोनटक्के, उपाध्यक्षा सौ.प्रेमला विश्वनाथराव सोनटक्के,माजी अध्यक्ष प्रभाकर सोनटक्के यांनी केले .तर जलव्यवस्थापन प्रमोद सोनटक्के यांनी केले.
सदर प्रशिक्षण जि.प.प्रा.शा.वानेगाव या शाळेत हर्षजल्लोषात पार पडण्यासाठी ; वानेगाव शाळेतील शिक्षक संतोष कुलकर्णी, सुदर्शन उपलंचवार, सुनिता गुड्डा यांनी विशेष परिश्रम घेतले.सदर प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी समन्वयाचे कार्य वानेगाव येथील शंकरराव सोनटक्के विश्वनाथराव सोनटक्के व उपक्रमशील शिक्षक युवराज पोवाडे यांनी पाहिले.