रुद्रानी कंपनीच्या ठेकदाराकडून वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली
हिमायतनगर, अनिल मादसवार| विकासाच्या वाटेवर देशाला पुढे नेण्यासाठी तर सर्वच राह्स्त्रीय महामार्गाला चकाकीत करणे गरजेचे आहे. यामुळे वाहतूक दालन- वळण सुलभ होऊन कमी वेळा मोठ्या शहराकडे जाता यावे आणि यात भारत देश सुध्दा मागे राहू नये. या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाकडून देशभर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहेत. याचा धर्तीवर अर्धापूर - फुलसांगवी या महामार्गाचे काम रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केले जात आहे. मात्र या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार आणी त्यांच्या सुपरवायजरकडून रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा चालविला जात आहे. या रत्स्याचे काम पूर्ण होण्याअगोदरच अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. या उलट आता हा रास्ता तर सर्वसामान्य वाहनधारक व जनतेसाठी डोकेदुखी ठरत आहेत. नुकतेच रस्त्याच्या कामासाठी वाहतूक केल्या जाणाऱ्या ओव्हरलोड वाहनातील गिट्टी थेट वाहतूक होणाऱ्या महामार्गावर पडल्यामुळे अनेक दुचाकीस्वाराची घसरगुंडी झाली आहे. यात काहींना दुखापत झाली असून, अश्या प्रकारे बांधकाम साहित्याची वाहतूक करून ठेकेदार आपला हेकेखोरपणा चालवीत सामान्य जनतेला मृत्यूच्या दारात नेऊन टाकण्याचा प्रयत्न तर करत नाःई ना...? असा सवाल वाहनधारक नागरीकातून विचारला जात आहे. कामात दिरंगाई बाळगून आता सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ चालविणाऱ्या ठेकेदारास वेळीच आवर घालण्यासाठी नितीन गडकरी यांनी लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊलचे उचलावीत अशी मागणी होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर-फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धापूर-हदगाव - हिमायतनगर-उमरखेड या तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम रुद्रानी कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत गेल्या ३ वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र या तीन वर्षात म्हणावी तशी कामाने गती घेतली नई, तर अनेक ठिकाणच्या पुलाची कामे अर्धवट ठेऊन संबंधी ठेकेदारने शेतकरी, वाहदनधारक, नागरिकांना विविध संकटात टाकले आहे. तर बांधकाम सुरु झालेल्या काळात अनेकांचा जीवही अर्धवट पुलाच्या कामामुळे गेला आहे. एवढेच नाहीतर या भागातील लोकांना कसा त्रास देऊन काम करता येईल यांचा चंग कंपनीने बांधलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा रस्ता हादगाव विधानसभा मतदार सांघाचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, यांच्या मूळ गावावरून जातो आहे. तरी देखील संबंधित कंपनीच्या यंत्रणेस या रस्त्याचे महत्त्व लक्षात येते नसल्याचे दिसते आहे.
रस्त्यांचे बांधकाम करताना मुरूम, रेती, मातीची गरज पडते. त्यासाठी अधिकचा खर्च करावा लागतो. महामार्गाचे काम सुरू आहे, अश्यात त्याच भागातील गाव तलाव, पाझर तलाव, नदी, नाले, शेततळ्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करून त्यातील मुरूम, माती महामार्गांच्या बांधकामासाठी वापरल्यास खर्चात कपात होऊन जलसंवर्धन करणे शक्य होऊ शकते, असा विचार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मनात आला. त्याला तातडीने मूर्तरूप देण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महामार्ग विकास, जलसंवर्धन, जलसमृद्धी, ग्रामीण विकास, मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्था, असा पंचसूत्री कार्यक्रम राबवित रस्ते विकासाला चालना देण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला गेला. मात्र रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने केंद्र शसांच्या महामार्ग विकास, जलसंवर्धन, जलसमृद्धी, ग्रामीण विकास, मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्व उद्देशाला हरताळ फासत रस्त्याचे काम करण्याचा सपाट सुरु ठेवला आहे. स्थानिक तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून माळ पोखरण्याचे कामे करत पर्यावरण बांध पोचविल्या गेल्याचे अनेक व्रत या आगोदर प्रसारित झाले आहे.
तरीदेखील रुद्राणी कंपनीचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही अशी धारणा ठेऊन ठेकेदार रस्त्याचे काम सणात गतीने करत असून, काम पूर्ण होण्याअगोदरच तामस ते जवळगाव दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याला तडे पोचले आहेत. नुकताच एक अजब प्रकार उघडकीस आला असून, जवळगाव ते आष्टी मार्गे तामसा या रस्त्याने गिट्टीची ओव्हरलोड वाहतूक टिप्परद्वारे केल्या गेल्याने सिमेंटीकरण रस्त्यावर गिट्टी पडल्याने अनेक दुचाकी वाहने घसरून पडली आहते. तर चारचाकी वाहनांधारकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागली आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जणू ठेकेदाराने वाहतुकीला खर्च कमी व्हावा या हेतून जास्त ट्रीप न करता मर्यादेपेक्षा अधिक वाहतूक करून जास्तीचे काम करून अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे नागरिक बोलून दाखवीत आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असून, हा प्रकार म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार ठेकेदाराकडून होत असल्याचा आरोप वाहनधकाकडून केला जात आहे. या प्रकाराकडे जिल्हाहंडीकरी यांनी लक्ष देऊन नांदेडमध्ये लातूर रोडवर ओव्हरलोड वाहनावर केलेल्या कार्यवाही प्रमाणे तामस - हिमायतनगर भागात रुद्राणी कंपनीच्या ठेकेदारच्या होत असलेल्या वाहतुकीच्या वाहनावर करून ठेकेदारास धडा शिकवावा आणि हा प्रकार त्वरित बंद करावा अन्यथा रुद्राणी कंपनीचे रस्त्याचे काम बंद पाडण्याचा निर्धार या भागातील प्रवाशी नागरिकांनी केला आहे.
अश्याने कुठं अपघात होतात का.... सुपरवायजर - याबाबत आमच्या प्रतिनिधीने पाच शिव हनुमान मंदिर येथे असलेल्या रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापकाच्या निदर्शनास ही बाब आणून देत याबाबत तोडगा काढावा अशी विनंती केली. मात्र एखाद्या वाहनाच्या मागील फलका खराब असेल त्यामुळे असा प्रकार घडला असावा, मात्र अश्याने कुठं अपघात घडला का...? तुम्हाला दुसरा कामच नाही असे सांगून जर काही झाल्यास आम्ही बघून घेऊ अशी हलगर्जीपणाची प्रतिक्रिया देऊन हात झटकले. यावरून कंपनीच्या वतीने अवैध वाहतूक करणे काही वावगे नाही..? भविष्यात जर अपघात घडला तर त्यांचे पुढे काय करायचे याची तयारी करून ठेवली असाच त्यांचा उद्देश असावा असे दिसते आहे.