किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चणा खरेदीस प्रारंभ - NNL


नांदेड|
किमान आधारभूत किंमत खरेदी  योजने अंतर्गत जिल्हा पणन कार्यालयामार्फत 2021-22 हंगाम नांदेड जिल्ह्यात नऊ ठिकाणी हमीभावाने चणा खरेदी करण्यासाठी मंगळवार 1 मार्च 2022 पासून खरेदीस सुरूवात झाली आहे. चालु हंगामासाठी चण्याचा हमीभाव प्रती क्विंटल 5 हजार 230 रूपये असून कृषी  विभागामार्फत उत्पादकतेनुसार 11.50 क्विंटल प्रती हेक्टर प्रमाणे हरभरा खरेदी सुरू आहे. 

चणा खरेदी नांदेड येथे जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी संस्था केळी  मार्केट इतवारा नांदेड (अर्धापूर), ता.ख.वि.संघ मुखेड, ता.ख.वि.संघ हदगाव, कृ.उ.बा.समिती किनवट, ता.ख.वि.सह संघ बिलोली (कासराळी), पंडित दी.उ.अ.संह संस्था देगलूर, ता.ख.वि संघ लोहा, कृषी माल प्रक्रिया संह संस्था गणेशपूर ता.किनवट, मृष्णेश्वर संह संस्था  जाहुर-बिल्लाळी ता.मुखेड या नऊ ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. 

खरेदी केंद्रावर हरभरा आणताना तो चागल्याप्रकारे वाळून, चाळणी  करून, एफ.ए.क्यू प्रतिचा  आणणे आवश्यक आहे. सर्व शेतकरी बांधवांनी चणा खरेदीसाठी संस्थेकडून पाठविलेल्या एसएमएस नुसार चणा खरेदी केंद्रावर आणावा. काही अडचण असल्यास 8108182948,9422994758 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी  केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी