विद्यार्थी विद्युत लाईटची सोय नसल्यामुळे मोबाईल टॉर्च चा वापर करून अभ्यास करत आहेत ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास विद्यार्थ्यांनी आणून दिलेली असतानाही विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणताही तोडगा काढलेला नाही त्यामुळे आदरणीय साहेबांनी तात्काळ याची दखल घेऊन विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करावे. अशी विनंती मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंट (मास) विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांना निवेदनाद्वारे केली आहे.
पुढे बोलताना श्रीकांत जाधव यांनी, आदरणीय कुलगुरू साहेब नक्कीच विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.