अशोकरावजी चव्हाण साहेबाच्या समर्थकाची लोकप्रियता पाहुन अनेकांच्या पोटात पोटसुळ -NNL


नांदेड, आनंदा बोकारे|
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे सक्रिय व धडाडीचे कार्यकर्ते सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी फिल्डींग लावताच तालुक्यातील प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांच्याकडून आतापासूनच दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचे दिसून येत आहे.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर व विश्वासू समर्थक मानले जाणारे सुभाष देशमुख हे अत्यंत सामान्य कार्यकर्ते आहेत. कोणत्याही पदाची लालसा किंवा अपेक्षा न बाळगता चिकाळेकर हे गेल्या अनेक वर्षापासून पक्षकार्यात हिरिरीने भाग घेतात. स्व.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजीक उपक्रम राबविण्यात देशमुख अग्रेसर असतात, काही दिवसांपूर्वीच त्यांनी वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम घेवून एक आदर्श निर्माण केला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत अनमोल असलेले विविध वृक्षांची लागवड करून स्व.शंकररावजी व स्व.सौ.कुसूमताई चव्हाण यांना आगळ्यावेगळ्या स्वरूपात श्रद्धांजली वाहण्याच्या त्यांच्या उपक्रमाला अनेकांनी दाद दिली आहे. 

खुद्द पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही चिकाळेकर यांचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वांसाठीच आदर्श ठरणारा आहे. कोणतेही राजकारण न करता समाजकारणाला प्राधान्य देणारे सुभाष देशमुख यांनी आगामी जि.प. व पं.स.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगट सर्कलमधून नशीब अजमावून पाहण्याची इच्छा व्यक्त करताच या सर्कलमधील पक्षातील अनेक जबाबदार पुढार्‍यांच्या भूवय्या उंचावल्या आहेत.

सुभाष देशमुख यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात, कार्यक्रम, समारंभ, लग्नसोहळा यासह गावकर्‍यांच्या सुखदुःखात सहभागी होवून त्यांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

मुदखेड शहर व तालुका काँग्रेस कमिटी आयोजित डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान रविवार दि. 13 मार्च 2022 रोज संपन्न झाला. त्यावेळी मा. आ. अमरनाथ राजूरकर, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व गोविंदराव शिंदे नागेलीकर साहेब बालाजी गाढे कांग्रेस प्रवक्ते  यांचा सत्कार चिकाळा गावकरी मिञमंडळ वतीने करण्यात आला. त्यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नांदेड शहर डिजिटल नोंदणी प्रमुख व ग्रामीण नोंदणी प्रमुख, विजय भाऊ येवनकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

 अनेक निवडणुकीपासून सुभाष देशमुख यांना मज्जाव करण्यासाठी काहींनी प्रयत्न सुरू केले असून काही ठिकाणी दबावतंत्राचाही वापर होत असल्याचे दिसून येत आहे. पथापि पक्षाने टाकलेली कोणतीही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे मार पाडणार आहोत, असे सांगून विरोधकांच्या दबावतंत्राला बळी न पडता पक्षश्रेष्ठी ना.अशोकराव चव्हाण साहेबांचा आदेश आल्यास कार्यकर्त्यांच्या मागणीला आपण नक्कीच खरे उतरू असा विश्वास सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी व्यक्त केला.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी