२००० कोटी रूपये असलेली देशातील सर्वात मोठी मल्टी-स्पोर्ट ऑनलाइन मोबाइल गेमिंग स्पर्धा
मुंबई| मोबाइल प्रिमिअर लीग (एमपीएल) या जगातील सर्वात मोठ्या मोबाइल ईस्पोर्टस् आणि स्किल गेमिंग व्यासपीठाने २४ मार्च २०२२ पासून सुरू होणा-या ग्रेट इंडियन गेमिंग लीग (जीआयजीएल)च्या शुभारंभापूर्वी सर्वांगीण मोहिमेची घोषणा केली. ही एकूण मूल्य २००० कोटी रूपये असलेली देशातील सर्वात मोठी मल्टी-स्पोर्ट ऑनलाइन मोबाइल गेमिंग स्पर्धा आहे.
या मोहिमेचा भाग म्हणून एमपीएल देशातील विभिन्न शहरांमध्ये टीव्ही व डिजिटल, तसेच प्रिंट अॅड्स अशा माध्यमांवर जाहिरातींची सिरीज रीलीज करेल. या जाहिरातींमध्ये मानवी बुद्धीकौशल्यावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे आणि यामागील संकल्पना अशी आहे की बुद्धी असलेला कोणीही एमपीएलवर फॅन्टसी टीम तयार करू शकतो आणि क्रिकेटच्या त्यांच्या ज्ञानासह मोठे यश मिळवू शकतो.
जीआयजीएलमध्ये फॅन्टसी क्रिकेट, कॅज्युअल गेम्स आणि ईस्पोर्ट्स अशा डिजिटल स्किल गेम्सच्या विभिन्न विभागांमधील ७ दशलक्ष खेळाडू पाहायला मिळतील. दोन महिन्यांच्या स्पर्धा कालावधी दरम्यान १५० लाख तासांहून अधिक वेळेपर्यंत गेमप्ले पाहायला मिळतील आणि ही स्पर्धा २९ मे २०२२ रोजी समाप्त होईल. जीआयजीएलमध्ये नवीन व रोचक फॉर्मेट्सचा देखील समावेश असेल, जे सांघिक खेळाची सुविधा देतील. जीआयजीएलच्या विविध गेम्समध्ये ३.५ दशलक्ष विजेते पाहायला मिळतील. विविध प्रकारच्या विभागांमधील ७० गेम्स असलेल्या एमपीएलमध्ये या लीगदरम्यान १ लाख रूपये ते १ कोटी रूपयांपर्यंतच्या बक्षीसासह हजारो विजेते पाहायला मिळतील.
मोबाइल प्रिमिअर लीगच्या (एमपीएल) भारतातील कंट्री हेड नम्रता स्वामी म्हणाल्या, "सर्वात मोठी मल्टी-गेम मोबाइल गेमिंग स्पर्धा म्हणून जीआयजीएल ईस्पोर्टसचे लोकशाहीकरण करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी बांधील राहत देशभरातील गेमर्सच्या व्यापक व वैविध्यपूर्ण समूहाला मोबाइल ईस्पोर्ट्स उपलब्ध करून देईल. आम्हाला विश्वास आहे की, या स्पर्धेमध्ये देशभरातील लाखो खेळाडूंचा सहभाग पाहायला मिळेल. आमची लीग भारतातील मोबाइल गेमिंग स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सर्वाधिक विजेते समोर आणण्यास सज्ज आहे. तसेच आम्हाला आशा आहे की, ही स्पर्धा अनेक फर्स्ट-टाइम गेमर्सना ईस्पोर्ट्स स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करेल."