नांदेड। कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी देगलूर येथील धडाडीचे आणि सक्रीय कार्यकर्ते गंगाधरराव यादवराव रावणपल्ले यांची निवड करण्यात आली आहे.
देगलूर येथे कुंभार समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेश कोअर कमिटी अध्यक्ष अॅड. संजय रुईकर, प्रदेश सरचिटणीस उत्तमराव मांजरमकर यांनी रावणपल्ले यांना निवडीचे पद दिले. यावेळी हनमंतराव गन्ने, पुंडलिक शिरुळे, पुंडलिक रांजणे, गोविंदराव पाटोदेकर, गंगाधर आमेटवार, गणेश अंबेकर, विलास नारनाळीकर, पंडित निमगावकर, रमेश नायगावाकर, रमेश पल्लेवाड आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी कुंभार समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सक्षमपणे प्रयत्न करून समाजातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध असल्याचे गंगाधरराव रावणपल्ले यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल रावणपल्ले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी तालुक्यातून असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी देगलूर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
देगलूर येथे कुंभार समाजाचा मेळावा संपन्न
नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार व सर्व नगरसेवकांचेही आभार मानण्यात आले. या मेळाव्यातून कुंभार समाजाताली मुलांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी चर्चा तसेच समाजातील विविध समस्या संबंधाने चिंतन आणि मंथन घडून आणले. अॅड. संजय रुईकर, उत्तम मांजरमकर, गोविंदराव पाटोदेकर, गंगाधरराव आमेटवार, गंगाधरराव रावणपल्ले, गणेश अंबेकर, आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. राजकीय कार्यकर्ते गंगाधरराव रावणपल्ले यांची जिल्हा वरिष्ठ कार्याध्यक्ष म्हणून यावेळी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमातून देगलूर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष म्हणून इरन्ना दंडेवार, युवा तालुकाध्यक्ष माधवराव नागपुरे, लक्ष्मणराव खानापूरकर (सल्लागार), बालाजी कोरपलवार (शहराध्यक्ष), रमेश सतकंटवार (शहर युवा अध्यक्ष), राहूल कोरपलवार (युवा शहर सचिव), लालू सतकंटवार (शहर सचिव) आदींची नियुक्ती करण्यात आली. सुत्रसंचालन जिल्हा सचिव पंडित निमगावकर व विलास नारनाळीकर यांनी केले. प्रारंभी गोरो•बा काकांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक डा•ॅ. शिवाजी नामपल्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गंगाधरराव रावणपल्ले, राजू मुजळगेकर, विजय पवार, प्रकाश पवार, राजू कोरपलवार, सोनु मुजळगेकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी तालुक्यातून असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.