लोहा| जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रशांत मोटरवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने त्यांना मित्र परिवारांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
विज्ञान विषयाचे तज्ज्ञ शिक्षक प्रशांत मोटरवार यांचे मागिल वर्षी १५ मार्च रोजी निधन झाले होते. त्याच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांना मित्रपरिवारांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डी ई वडजे, पंकज मोटरवार, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख अहमद, नागेश सावकार दमकोंडावार ,दिलीप कहाळेकर ,प्रकाश जिरेवार, पांडुरंग रहाटकर,
राहुल पारेकर, पत्रकार रत्नाकर महाबळे, प्रदीप कांबळे, शिवाजी पांचाळ, इमाम लदाफ, हरिहर धुतमल, व्यवस्थापक बालाजी धनसडे यांची उपस्थिती होती.यावेळी शिवछत्रपती माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोदर वडजे, पत्रकार इमाम लदाफ, अभ्यासिकेचे प्रमुख हरिहर धुतमल , यांनी स्व प्रशांत मोटरवार यांच्या आठवणी सांगितल्या .आभार रत्नाकर महाबळे यांनी केले .