लोहा| शिवसेना लोहा शहर प्रमुख मिलिंद पाटील पवार यांची बढती झाली असून त्यांची पक्षाच्या लोहा-कंधार विधानसभा संघटक पदी निवड करण्यात आली आहे
लोहा शहर प्रमुख मिलिंद पाटील पवार हे उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. तालुका प्रमुख सुरेश पाटील हिलाल यांची तीन महिन्या पूर्वी नियुक्ती झाली होती त्यानंतर बाळासाहेब कऱ्हाळे यांनी माजी आ रोहिदास चव्हाण व शिवसेना नेते ऍड मुक्तेश्वर धोंडगे याना ओव्हर टेक करीत आपल्या समर्थकांणा पक्षाच्या संघटनेत महत्वाची पदे मिळवून देण्यात त्यांना यश आले आ
मिलिंद पवार यांनी पक्षात केलेल्या कार्याची वरिष्ठांनी दाखल दाखल घेतली व त्यांच्यावर लोहा-कंधार विधानसभा शिवसेना संघटक पदाची जबाबदारी सोपविन्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्द हिंगोलीचे खा. हेमत पाटील, माजी आ. रोहिदास चव्हाण, संपर्क प्रमुख आनंदराव पाटील जाधव , जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोढारकर ,उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील क- हाळे, तालुका प्रमुख सुरेश पाटील हिलाल, किसान सेनेचे तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर, आदींनी अभिनंदन केले.