नविन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता करापोटी आठ दिवसांत १५ मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे यांनी केले आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली , अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम , उपायुक्त शुभम क्यातमवाड, यांच्या सुचनेनुसार थकबाकी मालमत्ता धारक यांच्या विरुद्ध जप्ती मोहीम हाती घेण्यात आली असून, सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक विलास गजभारे कर निरीक्षक सुधीर बैस, दिपक पाटील, वसुली लिपीक मारोती सांरग,मालु एनफळे, राजपाल सिंग जक्रीवाले, मारोती चव्हाण, साईनाथ देऊळगावकर, रविंद्र पवळे, संदीप धोंडगे, दता पानपटे या कर्मचाऱ्यांनी थकबाकी असलेल्या मालमत्ता व पाणीपट्टी धारक यांना सुचना देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने २५ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान जवळपास १५ मालमत्ता जप्ती केली असून यात खाजगी शाळा, दुकान, निवासस्थान, यांच्या समावेश असुन १६ लाख ४८ हजार ७४५ रुपये थकीत पोटी धनादेश घेण्यात आले असून जप्ती करताच ३ लाख २८ हजार ८९ रुपये वसुली केली आहे.
सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांनी थकबाकी भरून जप्ती टाळावी व मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या जप्ती मोहीम मुळे थकबाकी मालमत्ता धारक मध्ये खळबळ उडाली आहे.