13 पैंकी 13 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या
काँग्रेसचे उत्तमराव कदम, साहेबराव धनगे, सचिन नवघरे यांच्या पॅनलचा दारूण पराभव
नांदेड| लिंबगाव सेवा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या पद्मश्री सहकार विकास पॅनलने 13 पैकी 13 जागेवर दणदणीत विजय मिळवला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख तथा स्वयंघोषीत ज्येष्ठ नेते उत्तमराव कोंडोजी कदम, माजी जि.प. सदस्य साहेबराव धनगे, सचिन नवघरे यांच्या पॅनलचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. त्यांना भोपळाही फोडता आला नाही, हे विशेष. ही निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती, परंतु डॉ. सुनील शामराव कदम यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाल्याने विरोधकांचे पाणीपत या निवडणुकीत झाले आहे.
नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथील सेवा सहकार सोसायटीची 13 जागांसाठी दि. 27 मार्च रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत पद्मश्री सहकार विकास पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामध्ये पॅनलचे प्रमुख डॉ. सुनील शामराव कदम, संजय भगवानराव कदम, कदम गोपाळ आबनराव, पोपळे दिगंबर रावसाहेब, कदम अनिल जर्नादन, कदम विश्वास वामनराव, कदम दत्तात्रय पंडीतराव, शिंदे नेमाजी मारोतराव यांचा सर्वसाधारण उमेदवार म्हणून विजय झाला. तर महिला राखीव मतदार संघातून कदम जयश्री धनाजी, पोपळे प्रेमलाबाई दौलतराव, अनुसूचित जाती-जमातीमधून पोहरे नानासाहेब भिवाजी यांचा विजय झाला तर निवडणुकीपूर्वीच ओबीसी विजय सुभानराव घाटोळे, एनटीमधून बाबाराव शिवराम पवार हे दोघेजण बिनविरोध पॅनलमधून निवडून आले होते. 13 पैंकी 13 जागेवर डॉ. सुनील कदम यांना या निवडणुकीत यश मिळाले आहे. पद्मश्री सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांना 178 ते 166 एवढे मतदान पडून ते विजयी झाले आहेत.
काँग्रेसचे शेतकरी विकास पॅनलचे उत्तमराव कोंडोजी कदम यांच्या पॅनलचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. तसेच माजी जि.प. सदस्य साहेबराव धनगे, सचिन नवघरे यांनीही ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. या तिन्ही स्वयंघोषीत पॅनलप्रमुखांना मतदारांनी नाकारले. शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना साधारण 68 ते 61 अशा पद्धतीचे प्रत्येकी मते प्राप्त झाली होती. त्यामुळे पराभवाचा सामना काँग्रेसला करावा लागला. काँग्रेसने या ठिकाणी मोठे वजन खर्चले होते, परंतु डॉ. सुनील कदम यांच्यासमोर व त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली विरोधकांना शून्यही फोडता आला नाही, हे विशेष.
सेवा सहकारी सोसायटी लिंबगाव निवडणुकीत पद्मश्री सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सुभाषराव शामराव कदम, गोपाळराव विश्वांभरराव कदम, धोंडीराव भालेराव, तानाजी भालेराव, डॉ. संजयराव कदम, प्रतापराव विश्वांभराव कदम, वामनराव कदम, प्रा. शिंदे, अवधुत तातेराव, दशरथ पोपळे, दिलीपराव कदम, श्यामराव कदम, विश्वास कदम, गोपाळ कदम, भिवाजी पोपळे, बाबूराव बोकारे, मनोहर कदम, दिगंबरराव कदम, त्र्यंबकराव कदम, मोहनराव कदम, भगवान कदम, रावसाहेब कदम, रंगनाथ कदम, अशोक कदम, बाबाराव कदम, गोपाळराव कदम, बाबाराव कदम, किशन कदम, गोविंद कदम, अ. कादर अ. हबीब, गोविंद कदम, गोपीनाथ कदम, शेख एजाज, शे. मेहबुब, बाबूराव डाडाळे, भीमराव शितळे, आबाजी नरवाडे यांनी परिश्रम घेतले.