नायगाव, दिगंबर मुदखेडे| शिवसेना सत्ताधारी पक्षाचे आमदार संतोष बांगर यांनी वंचितांचे नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याच्या वंचित बहुजन आघाडी नायगाव तर्फ निषेध करण्यात आला.
संतोष बांगर यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना भाजपाने एक हजार कोटी दिले असे आमसभेत स्टेजवर बोलताना व्हिडिओ वायरल झाला. संतोष बांगर यांना धड विधान भवनामध्ये मराठी वाचता येत नाही. यांनी एक हजार कोटी घेतले असे आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर केले. खरंच एक हजार कोटी घेतले असते तर पुरावे सादर करा अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आ. संतोष बांगर यांना रस्त्यावर फिरू देणार नाही .
अन्यथा प्रकाश आंबेडकर साहेब यांची माफी मागा नाक घासून पाया पडा चूक झाली माफ करा पुन्हा बोलणार नाही. माफी मागत नसेल तर माफी मागेपर्यंत तुमची बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शांत बसणार नाही.यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी तालुकाध्य मा.रामकिशन पालनवार, तालुकाउपाध्यक्ष मा. भीमराव जोंधळे ,तालुकाउपाध्यक्ष मा.प्रभाकर घंटेवाड, तालुका महासचिव,मा.साहेबराव कोपरेकर, तालुका संघटक मा. बालाजी गायकवाड, मा. बाळासाहेब वाघमारे, नरंगल नगरीचे उपसरपंच मा.प्रकाश वाघमारे उपसथितांसमोर स.पोलीस निरीक्षक नायगाव अभिषेक शिंदे यांना निवेदन देण्यात आले.