१५ मालमत्ता जप्त तर २६ नळ कनेकशन तोडले
नविन नांदेड| मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता करापोटी १५ तर पाणीपट्टी थकबाकी वसुली पोटी नळ कनेक्शन २६ व मालमत्ता धारकांच्या मालमत्ता सिल करण्यात आल्या असून ३१ मार्च अखेर दिलेल्या वसुली उदिष्ट पुरती कडे हे क्षेत्रीय कार्यालय वाटचाल करीत आहे.
नावामनपा चे आयुक्त डॉ सुनिल लहाने, यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अविनाश अटकोरे व कार्यालय अधीक्षक विलास गजभारे व करवसुली निरीक्षक सुधीर बैस व दिपक पाटील व लिपिक वसुली मारोती सांरग, मालु एनफळे, राजपाल सिंह जक्रीवाले, राहुल सोनसळे, साईनाथ देऊळगावकर,संदीप धोंडगे,यांनी मालमत्ता करापोटी १५ जप्ती करण्यात आल्या असून दुकाने व घरे यांच्या समावेश आहे.
यात नऊ जणांनी धनादेशव्दारे १२ लाख ७१ हजार चारशे विस रूपये भरणा केला उर्वरित सहा जणाची जप्ती केली आहे,नळपटटी वसुली थकबाकी असणा-या मालमत्ता धारकांचे २६ नळकनेकशन जणांचे तोडण्यात आले, असुन १२ लाख २९ हजार ७१ थकबाकी असुन ८ जणांनी ८० हजार जमा झाले आहेत,या जप्ती मोहीमेत वसुली प्रमाण वाढले आहे, मालमत्ता धारकांनी जप्ती टाळुन मालमत्ता कर व नळ पाणी पट्टी भरून मनपास सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे यांनी केले आहे.
गत वर्षीच्या तुलनेत दोन कोटी दहा लाख रुपये वसुली झाली असून कर निरीक्षक व वसुली लिपीक यांच्या पथकाने व संबंधीत वसुली लिपीक यांनी मालमत्ता धारक यांच्या कडे वांरवार सुचना दिल्यामुळे वसुलीचे प्रमाण वाढले आहे.३१ मार्च अखेर २ कोटी ५० लक्ष रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.