वाजेगाव सर्कल मध्ये करणार -- जि.प.सदस्य मनोहर शिंदे
नवीन नांदेड| आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व पक्ष संघटन बांधणीसाठी काँग्रेसकडून डिजीटल सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे . या नोंदनी अभियानात वाजेगाव -धनेगाव ह्या सर्कलमधुन सर्वात जास्त नोंदणी करणारे सर्कल असतील असे मत वाजेगाव जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी धनेगाव येथे काँग्रेस पक्षाची डिजीटल नोंदणी उदघाटन कार्यक्रमात व्यक्त केले.
काँग्रेस पक्षाची बांधणी व पक्ष वाढीसाठी राज्यात पक्षाचे डिजीटल नोंदणी अभियान कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यात वाजेगाव - धनेगाव सर्कल मध्ये डीजीटल नोंदणी अभियानाचे आयोजन दि २६ रोजी धनेगाव येथे करण्यात आले होते. या अभियानाचे उदघाटन वाजेगाव जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी धनेगावचे सरपंच गंगाधर शिंदे , ऊपसंरपच डॉ.पुजा मनोहर शिंदे,जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य भुजगराव भालके , वाजेगाव सरपंच शेख जम्मील ,शिवकांत कदम , पंचायत समिती उपसभापती प्रतिनिधी फयुम, याच्यासह वाजेगाव - धनेगाव सर्कल मधील वडगाव , तुप्पा ,काकांडी, भायेगाव, किक्की , राहेगाव , बोंढार , पिपळगाव यासह विविध गावाचे सरपंच व काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती होती .
यावेळी जि.प. सदस्य मनोहर पाटील शिंदे डोअर टू डोअर जाऊन सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येईल यासाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले तरच आपण तालुक्यात सर्वात जास्त डिजीटल नोंदणी करणारे सर्कल म्हणुन समोर येवुत .माझ्या सोबत सर्वानी जिल्हयाचे पालकमंञी अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी हि नोंदणी करावी .या दोन सर्कल मधुन ११हजार नोंदणी व्हायलाच पाहिजे यासाठी प्रत्येकाच्या घरा पर्यत जाण्याचा निर्धार त्यांनी करुन हे दोन सर्कल तालुक्यात प्रथम रहातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदस्य नोंदणीला उत्स्फुर्त प्रतिसाद - पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काँग्रेस पक्षाची टीम वाजेगाव सर्कलमध्ये प्रत्येक गावात घरा-घरात डोअर टू डोअर जाऊन सदस्य नोंदणीसाठी काम सुरु झाले आहे . मनोहर शिंदे हे सर्वात जास्त नोंदणी करणारे ठरतील असा विश्वास भेटी दरम्यान व्यक्त करत सदस्य नोंदणी डिजीटल असल्यामुळे मोबाईल घेऊन घरोघरी जात आहोत, सदस्यांचा मोबाईल फोटो घेतला जात आहे. बर्याच ठिकाणी मतदार स्वतःहून नोंदणीसाठी पुढे येत आहेत. सर्कलमध्ये नोंदणीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. असे मत आ मोहनराव हंबर्डे यांनी या अभियानाला भेटी दरम्यान धनेगाव येथे व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शेख गफुर,रफीक भाई,तातेराव ढवळे, जंगमे राजेश बोटलवार, शिवाजी बुचडे,निलेश भालके,एजाज शेख, रमेश मोरे,माधव देशमुख, साईनाथ शिंदे,श्रिकांत शिंदे, एकनाथ शिंदे बळीराम शिंदे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.