माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत किनवट शहरात मॅरेथाॅन संपन्न -NNL


किनवट|
माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत किनवट शहरात आज (२८ मार्च) मॅरेथाॅन पार पडली. दरम्यान वसुंधरेची कसलीही हानी होणार नाही (शहर स्वच्छतेची) यासाठी सामुदायिक शपथ घेण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे सर्वच नगरसेवकांची उपस्थिती दिसून आलेली नव्हती. नागरीकांसह सर्व स्तरातील संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग होता हे विशेष.

आज मितीस किनवट शहरातील वसुंधरेची अवस्था सर्वांंच्या समोर आहे. अशा वेळी माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ साठी हा उपक्रम नगर परिषदेने हाती घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सहायक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या उपस्थितीत जाहीर शपथेद्वारे वसुंधरेला अबाधित ठेवण्याचे अभीवचन उपस्थितांनी दिले आहे. प्लाॅस्टीकमुक्त शहर करण्याची धडपड चालू आहे. वसुंधरेला बाधा पोहोचणार नाही अशा सर्वच बाबींवर किनवटकरांनी सहयोग दिल्यास सहज शक्य असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

भव्य मॅरेथाॅन यशश्वी करण्यासाठी नगर परिषदेने आवाहन केले होते मात्र कांही नगरसेवकांची उपस्थिती दिसून येत नव्हती. व्यापारी असोसीयशन, न.प.कर्मचारी, डाॅक्टर्स संघटना विविध स्तरातील नागरीकांची  उपस्थिती होती. छत्रपतींच्या चौकापासून मॅरेथाॅनला सुरुवात होऊन नगर परिषदेत समारोप झाला. प्रभारी मुख्याधिकारी डाॅ.मृणाल जाधव, नगराध्यक्ष आनंद मच्चेवार, उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानिवार, श्रीनिवास नेम्मानिवार, अजय चाडावार, साजिदखान, अभय महाजन यांच्यासह कांही नगरसेवकांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी