नांदेड| शिर्डीच्या धर्तीवर साईच्या भाविक भक्तांना नांदेड मध्येच श्री साईबाबांचे दर्शन करता यावे या अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संकल्पनेतून नांदेड लातूर रोड वरील धनगरवाडी येथे उभारण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिरात आज श्री नंदिकेश्वरांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नंदिकेश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी खंडू गुरू असोलेकर, धनंजय हळदेकर, महेश जोशी मुरंबेकर, ओमकार सांगवीकर ,वैभव अपस्तंभ, अमोघ असोलेकर आणि नरेश जोशी या साधुसंतांची उपस्थिती होती. धनगरवाडी येथे उभारण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिर कलशारोहण स्थापनेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 26 मार्च रोजी येथे भव्य कीर्तन सोहळा सत्संग आणि साधुसंतांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता .खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते यावेळी साधुसंतांचे सत्कार सोहळे पार पडले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज दिनांक 28 मार्च रोजी विधिवत पूजाअर्चा करून साईबाबा मंदिरात नंदिकेश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
खंडू महाराज असोलेकर यांनी यावेळी मंत्रोच्चार केला .नंदिकेश्वर यांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी सौ.प्रतिभाताई प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ प्रणिताताई देवरे - चिखलीकर, सौ.वैशालीताई प्रवीण पाटील चिखलीकर, अँड.संदीप पाटील चिखलीकर, सौ. सोनालीताई संदीप पाटील चिखलीकर, लोह्याचे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, सुनील मोरे, पप्पू पावडे, शंकराव कोंके, साहेबराव चिखलीकर, उमेश कदम, चंद्रविलास कदम, मारुती आढाव, सुरेश पुजारवाड, दुर्गादास महाराज आदींची उपस्थिती होती.