महागाई, बेरोजगारी आणि कामगार कायद्याविरोधात नांदेडमध्ये बँक कर्मचारी आणि अधिकार्‍यांचा सरकारविरोधात एल्गार-NNL


नांदेड|
दिनांक 28 आणि 29 मार्च रोजी देशभरातील नऊ कोटी कामगारांसह बँकींग क्षेत्रांमधील AIBEA , AIBOA आणि BEFI या तीन संघटना या देशव्यापी संपामध्ये सहभागी आहेत. या संपाचा एक भाग म्हणून नांदेड शहरातील जवळपास ५० बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी आज बँक ऑफ महाराष्ट्र चिखलवाडी शाखेसमोर आपल्या विविध मागण्यासाठी सरकारविरोधी निदर्शने केली. 

यावेळी बोलताना बँक कर्मचार्‍यांचे नेते म्हणाले की, जनतेने खूप अपेक्षा सह एकदा नाही तर दोनदा या सरकारला निवडून दिले. जनतेला अपेक्षा होती की, आपल्या हाताला रोजगार मिळेल महागाई कमी होईल अशा विविध प्रकारच्या अपेक्षा जनतेनी या सरकारकडून केलेल्या होत्या. परंतु प्रत्यक्षामध्ये आज महागाईच्या झळा या देशातील गोरगरीब जनतेला बसत आहेत तसेच कोरोना च्या काळामध्ये अर्थ व्यवस्था ठप्प असताना फक्त आणि फक्त श्रीमंत लोकांच्या संपत्ती मध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे हे सरकार देशातील 135 कोटी गोरगरीब जनतेसाठी काम करत आहे की फक्त देशातील दोन मोठ्या श्रीमंत साठी काम करत आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागच्या बजेटमध्ये आयडीबीआय बँकेसह इतर दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करणार असल्याचे जाहीर केले, परंतु लोकसभेच्या मागील अधिवेशनामध्ये बँकिंग कायद्यातील बदलांचा अजेंडा असतानासुद्धा त्यावर काहीही कामकाज झालेले नाही त्याला पार्श्वभूमी होती ती त्यावेळी शेतकरी कायदे या सरकारला मागे घ्यावे लागले होते आणि देशांमधील प्रमुख पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या. देशातील पाच राज्यांतील निवडणुका झाल्यानंतर आणि त्या निवडणुकांचे निकाल हाती लागल्यानंतर या सरकारचा पुन्हा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आता कोणत्याही क्षणी हे सरकार बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट मध्ये बदल करू शकते. 

तसेच कोणत्याही क्षणी या देशातील बँकांचे खाजगीकरण केले जाऊ शकते. सरकार विरोधी ही लढाई फक्त रस्त्यावरच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या तेवढ्याच ताकतीने लढायची असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. आजच्या निदर्शनांमध्ये नांदेड शहर आणि आसपासच्या परिसरातील जवळपास शाखेतील बँक कर्मचारी अधिकारी सहभागी होते. तर आजच्या या बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नांदेड शहर आणि जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक या बँका वगळता इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे कामकाज ठप्प झाले होते. यावेळी संघटनेचे रियाज कासार, स्वाती पील्लेवार, सागर दिक्षीत, राम डूकरे व ईतर कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी