हिमायतनगर| महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी,आपंग,निराधार जेष्ठनागरिक व विविध क्षेत्रातील मंडळीचे प्रश्न मार्ग लावणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना.बच्चुभाऊ कडू यांच्या कार्याकडे पाहुण हिमायतनगर तालुक्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हिमायतनगर तालुक्यातील शिवसेनेत झालेली गटबाजी पाहता मागील काही महिन्यापासून एक एक करत अनेक कार्यकर्ते शिवसेनेला जय महाराष्ट्र करत असल्याचे दिसते आहे.
ना.बच्चूभाऊ कडू यांची विचारधारा आत्मसात करून नांदेड जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख आणि भोकर तालुका अध्यक्ष अँड.शेखर कुंटे (सरसमकर) यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे सरसम ता.हिमायतनगर येथिल विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. सरसम येथील सक्रिय शिवसैनिक श्री दत्ताजी देशमुख यांच्यासह शुभम जाधव करंजीकर, विकास ताडेवड, गणेश दारपवाड, गजानन शिंदे, विकास नरवाडे, अमोल बोले, हर्षद इलियास पठाण, श्याम सूर्यवंशी गुलाबराव हराळे, नागसेन कपडे शेख मोबीन शेख गुलाब इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार पक्षात जाहीर प्रवेश केला.
विशेष म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्तांनी आता हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पक्षाचे झाळे पसरुन पक्षाचे कार्य जोमात चालु करुया यापुढे येणार्या निवडणुकीत नगर पालिक,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविणार असल्याची तयारी केली असल्याचेही त्यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना सांगितले आहे.