डुकराची धरपकड थांबवा अन्यथा कुटुंबासह आत्महत्येची परवानगी द्या -NNL

जिल्हाधिकारी यांच्याकडे डुकर पालन संघटनेची मागणीचे निवेदन 


नवीन नांदेड|
शेकडो वर्षापासुनचा पारपारीक व्यवसाय असलेल्या विमुक्त भटक्या जातीतील कैकाडी,वडार,सिकलकरी, वाल्मिकी यासह इतर जातीचा डुकर पालन हा मुख्य व्यवसाय असुन यावरच कुंटुंबाची संपुर्ण जबाबदारी असुन मनपा प्रशासनाने पुर्वसुचना न देता डुकराची धरपकड सुरु केली . त्यामुळे डुकर पालन करणाऱ्या कुंटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, मनपा प्रशासनाकडुन हि मोहिम तात्काळ थांबवावी अन्यथा कुंटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी आम्हाला द्यावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांनी डुकर पालन संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे मागणी केली .

नांदेड शहरातील मोकाट फिरणाऱ्या डुकरांना पकडण्यासाठी चन्नई येथील एका संस्थेला महापालिकेने  नियुक्त केलेल्या कंपनीकडुन महापालिका हद्दीत बेवारस फिरणारी डुकरे उचलणे आणि त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेतल्यानंतर डुकर पालन संघटनेकडुन या मोहिमेला कडाडुन विरोध करण्यात येत आहे. दि २६ रोजी डुकर पालन संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात डुकर पालन हा व्यवसाय शेकडो वर्षापासुन सुरु असुन या व्यवसायावर  विमुक्त भटक्या जातीतील कैकाडी,वडार,सिकलकरी, वाल्मिकी, यासहअनेक जातीचा उदर्निवाह सुरु आहे . 

याच व्यवसायावर कुंटुंबाची जबाबदारी असुन मुलीचे लग्न ,मुलाचे शिक्षण यासह सर्व जबाबदारी याच व्यवसायवर असुन मनपा प्रशासनाकडुन हा व्यवसाय मोडीत काढण्याचे षडयंत्र सुरु झाले आहे ,मनपा प्रशासनाने आम्हाला कुठली पुर्वसुचना , नोटीस न देता केवळ आकसातुन हि कार्यवाही करत आहे . पुर्वसुचना दिली असती तर आम्ही व्यवसाय वाचवण्यासाठी काही तरी पाऊले उचलली असती . मनपा प्रशासनाच्या या कार्यवाहिमुळे डुकर पलन  कुंटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे . मुलाचे शिक्षण , लग्न यासह सर्वच बंद होवुन आम्हाला भिक मागण्याची वेळ आली असुन हि मोहीम तात्काळ थांबवावी अन्यथा वेगवेगळ्या मार्गाने उपोषण ,धरणे ,आंदोलन उभारावे लागेल . जिल्हाधिकारी यांनी डुकर पालन परिवाराचे पुनर्वसन करावे अन्यथा कुंटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी असे  सहा पाणी निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे . 

यावेळी ठाकुर सिंह बावरी ,स.जसपालसिंह लांगरी, माजी नगरसेवक श्याम जाधव, शेरसिंघ बावरी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितुसिंग टाक,मरीबा वाघमारे,बलजितसिंघ बावरी, संभाजी यलप्पा देवकर,पापसिंघ जुनी,दिपसिंघ बावरी,बाबासिंघ जुनी, लाखनसिंघ टाक,बलबीरसिंघ बावरी, यलप्पा भाने,राम साकडीकर, दारासिंग टाक, अकाशसिंघ बावरी, बालाजी मेटकरी, रामकिशन जाधव, भगवान माने, आझाद सिंग बावरी, यांच्यासह डुकर पालन संघटनेचे पदाधिकाऱ्याची उपस्थिती होती .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी