हदगाव,शे चांदपाशा| हदगाव शहरातील येथील पत्रकार संजय सूर्यवंशी यांच्या कार्याची दखल घेऊन साधना मराठी वाहिनीने सूर्यवंशी यांना साधना अचिव्हर्स जीवन गौरव पुरस्कार या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पनवेल मुंबई येथे झालेल्या शानदार सोहळ्यात त्यांना दैनिक देशोन्नती चे एडिटर इन चीफ प्रकाश भाऊ पोहोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पनवेल मुंबई येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात या पुरस्कारांचा वितरण सोहळा 26 मार्च रोजी थाटात पार पडला पनवेलच्या महापौर श्रीमती डॉक्टर कविता चोतमाल देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे, सेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे ,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर, प्रसिद्ध अभिनेत्री सुषमा मुरुडकर, श्री विठ्ठल रुक्माई मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखक व इतिहास संशोधक डॉक्टर प्रेम हनवते यांची प्रमुख उपस्थिती होती.
मागील पंधरा वर्षापासून हदगाव तालुक्यात संजय सूर्यवंशी पत्रकारितेचे काम करत असतात. पत्रकारितेची सुरुवात स्वतःच्या साप्ताहिक का पासून सुरू केली पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासनावर प्रहार करत सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले दैनिक देशोन्नती या दैनिकाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन वेळोवेळी त्यांचा सन्मान केला तसेच मागील काळात सर्वानुमते तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी त्यांना विराजमान करण्यात आले होते.
मागील अनेक वर्षापासून पत्रकारिता करत असलेल्या संजय सूर्यवंशी यांच्या कार्याची दखल घेत साधना मराठी वृत्तवाहिनी ने संजय सूर्यवंशी यांना साधना अचिव्हर्स जीवनगौरव पुरस्कार नुकताच प्रदान केला असून त्यांना मिळालेल्या मानाच्या पुरस्कारामुळे सर्व स्तरातील नागरिकांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या समवेत पत्रकार गजानन पाटील ,परविन दुधारे, राहुल बहादुरे ,त्रिभुवन चव्हाण, स्वप्निल गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साधनाचे महाराष्ट्र हेड स्वप्निल कुमार दुधारे, विजयकुमार कोल्हे ,पुरुषोत्तम सांगळे, नीलम आंधळे, खुशी सावर्डेकर, राजश्री राठोड, सुषमा जाधव, अमोल राणे ,अभिषेक पाटील ,कृष्णा यादव, कन्हैया कुरील, संतोशी रसाळ ,मानसी धामणकर ,निलेश उपाध्य ,सरिता कदम या टीमने मेहनत घेतली.