हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय रासेयो विभागाच्या वतीने मौजे सरसम येथे आयोजित शिबिरामध्ये शिबिरार्थींनी सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आदिवासी जननायक तंट्या भिल्ल अशा चार महामानवांच्या पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता करून अभिवादन केले. सकाळी गावातील ग्रामपंचायतीच्या बोअरवेलच्या नी संबंधित पुतळ्यांच्या परिसरात व सामाजिक रस्त्यावर पाणी मारुन नंतर रस्ते व परिसर स्वच्छ केला. आणि संपूर्ण केरकचरा जाळून नष्ट केला. शेवटी 12 वाजेपर्यंत ग्रामपंचायत, समाजमंदिराचा परिसर सुध्दा स्वच्छ करण्यात आला.
दुपारच्या सत्रात इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. प्रविण सावंत यांनी "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (उच्च शिक्षण) बदलती शिक्षण प्रणाली" या विषयावर शैक्षणिक धोरणांची अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल अशी मांडणी केली. तर पाणी आणि आरोग्य या विषयावर दुसरे मार्गदर्शक पर्यावरण विभागाचे प्रा. डॉ. कृष्णानंद पाटील यांनी पाण्यावर माणसाच आरोग्य कस अवलंबून आहे हे सांगताना दुषित पाण्यामुळे होणार्या रोगांची सविस्तर मांडणी केली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रासेयो चे सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल.बी. डोंगरे हे लाभले होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून रासेयो चे कार्यक्रमाधिकारी डॉ शिवाजी भदरगे व प्रा. मुकेश यादव हे होते. तर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वसंतराव कदम, प्रा डॉ. शाम इंगळे, प्रा. डॉ. शेख शहेनाज आदी उपस्थित होते.
संध्याकाळच्या तिसऱ्या सत्रात रासेयो चे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे व क्रिडा विभागाचे प्रमुख डॉ. दिलिप माने यांच्या संकल्पनेतून गीत गुंजन यासदाबहार गीतांचा कार्यक्रम रासेयो चे विद्यार्थी कु. रेणु तिमापुरे, कु. वैष्णवी कंठाळे, निलेश चटणे, कु. श्रद्धा राका या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कराओके म्युझिक च्या माध्यमातून गीते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी रासेयो चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व गावकरी मंडळी उपस्थित होती.